Breaking

Parinay Fuke : भाजपने केली आमदार भोंडेकरांची कोंडी !

MLA Narendra Bhondekar targeted by BJP : विधानसभा निवडणुकीतील व्हिडिओ केला व्हायरल

Nagpur : महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे, असे भासवण्याचा तिन्ही पक्षांकडून प्रयत्न होत असतो. पण वास्तविकतः तसे नाही, हे दाखवणाऱ्या बऱ्यासशा घटना घडतात. याचे ताजे उदाहरण द्यायचे झाल्यास भंडारा जिल्ह्यात सुरू असलेल्या महायुतीमधील अंतर्गत राजकारणाचे देता येईल. येथे भाजप नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या सहकारी बॅंकेच्या निवडणुकीवरून कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय.

भंडारा – गोंदिया जिल्ह्यांतील सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी भोंडकर यांनी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत युती केली आहे. त्यावरून डॉ. फुकेंनी भोंडेकरांवर निशाणा साधणे सुरू केले. महायुतीतील या दोन नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळते आहे. परवा – परवा आमदार भोंडेकर यांनी केलेल्या वक्तव्याला आमदार डॉ. फुके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. ‘प्रफुल पटेल आणि भाजपमुळे तुम्ही निवडून आले, हे विसरू नका’, असे म्हणत डॉ. फुके यांनी भोंडेकरांना आठवण करून दिली होती. त्यानंतर फुकेंना भंडाऱ्यातील राजकारण कळत नाही, असं म्हणत भोंडेकरांनी देखील त्यांना डिवचले होते.

ZP School : शाळा सुधारावी म्हणून विद्यार्थ्यांचे ‘भीख मांगो’ आंदोलन!

गुरुवारी, दि. १९ जूनला आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी पुन्हा खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले. विधानसभेच्या निवडणुकीत मला कुणी मदत केली नाही, तर मी स्वबळावर निवडून आलो, असे ते म्हणाले होते. त्यावर भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीतील आमदार भोंडेकर यांच्या जाहीर सभेच्या भाषणातील व्हिडिओ व्हायरल केले.

Nagpur BJP : नवीन पिढीपर्यंत आणीबाणीची दाहकता आणण्यावर भर

व्हिडिओमध्ये काय ?
भाजपने व्हायरल केलेल्या व्हिडिओमध्ये आमदार भोंडेकर हे आमदार डॉ. फुके यांची जाहिरपणे माफी मागत आहेत. याशिवाय जे युती तोडण्याचा प्रयत्न करत आहेत, ते गुन्हेगार आहेत, असेही भोंडेकर बोललेले आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोंडेकरांची चांगलीच कोंडी झाली आहे. आरोप – प्रत्यारोपाच्या या लढाईत आता भोंडेकर भाजपला म्हणजे आमदार डॉ. फुकेंना काय उत्तर देणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.