BJP leader criticizes Shinde group MLA : आता त्यांना पद मिळाले, त्यामुळे परफॉर्म करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Nagpur : महायुतीमध्ये सर्व काही आलबेल आहे, असे भासवण्याचा सातत्याने लाडक्या बहीणींचे तिन्ही भाऊ प्रयत्न करत असतात. मात्र प्रत्यक्षात स्थिती तशी नाहीये, हे दर्शवणाऱ्या अनेक घटना समोर येत असतात. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. महायुतीचा भाग असलेले भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याच दोन नेत्यांमध्ये जुंपल्याचे बघायला मिळत आहे. दोन्ही नेत्यांचे कार्यक्षेत्र भंडारा-गोंदिया जिल्हा आहे.
सहकार क्षेत्रावर एके काळी काँग्रेसचे वर्चस्व होते. पण आता भारतीय जनता पक्षाने सहकार क्षेत्रात निवडणुका लढवणे सुरू केले आहे. त्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखणे स्वाभाविक आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांना आता पद मिळाल्यामुळे ते काहीतरी परफॉर्म करून दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ते एक गोष्ट विसरले की, भाजप आणि प्रफुल पटेल यांच्या भरवशावर ते निवडून आले आहेत, असे म्हणत माजी राज्यमंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी नरेंद्र भोंडेकर यांना सुनावले.
Cabinet meeting : कॅबिनेटमध्ये उन्हाळी पिकांच्या नुकसानाचा आढावा !
नागपुरात आज (ता. १७ जून) पत्रकारांशी बोलताना डॉ. फुके म्हणाले, भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये अनेक लोक प्रवेश घेत आहेत. ज्या लोकांना भाजपमधून निष्कासीत करण्यात आले, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये आम्हाला आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही. कारण प्रत्येकाला आपलं स्वातंत्र्य आहे. ते कुठल्याही पक्षात जाऊ शकतात. पक्ष मोठा होत असताना अनेक नवीन लोक येत असतात. अनेक नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
Cabinet meeting : शेतीसाठी AI धोरण, धारावी पुनर्विकास, ग्रामपंचायत स्तरावर हवामान केंद्र
काँग्रेस आणि इतर पक्षांमध्ये जे नैराश्य आहे, त्यामुळे लोक विचारात पडले आहेत. पुढे काय होणार, हे स्पष्ट दिसत नसल्यामुळे नवीन लोक भाजपमध्ये येत आहेत. अशा परिस्थितीत त्यांचे स्वागत केलं पाहिजे, असे डॉ. फुके म्हणाले. शिंदे गटाच्या आमदारांना निधी मिळत नाही, याबद्दल विचारले असता, अनेक मतदारसंघांत निधी दिला जात नाहीये, हे बरोबर आहे. पण अनेक मतदारसंघांत जुनी कामे सुरू आहेत. त्यामुळे यावर्षी नवीन कामांसाठी निधी मिळणार नाही, असे डॉ. परिणय फुके यांनी सांगितले.