Sharad Pawar says, family and politics are separate : पार्थ पवार प्रकरणावर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
Akola राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कथित भूखंड घोटाळ्याबाबत गंभीर भूमिका घेतली आहे. “पार्थ पवारांचे प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हा विषय गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने चौकशी करून वस्तुस्थिती समाजापुढे ठेवावी,” असे पवार म्हणाले.
अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार हे १,८०० कोटींच्या जमिनीचा अवघ्या ३०० कोटींमध्ये व्यवहार केल्याच्या आरोपामुळे चर्चेत आहेत. विरोधकांनी यावरून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी समिती स्थापन केली असून, समितीचा अहवाल महिन्याभरात येणार आहे.
पवार म्हणाले, “सरकारने कालच समिती स्थापन केली आहे. अहवाल आल्यानंतर काय होते ते पाहू. चौकशी समिती स्थापन केल्यामुळे पुढील पाऊल सरकारकडून अपेक्षित आहे.”
BJP Politics : हंसराज अहिर यांना झटका; खंदे समर्थक प्रशांत समर्थ यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पवार म्हणाले, “मला अजित पवारांना जाणूनबुजून लक्ष्य केले जात आहे का हे सांगता येणार नाही. पण मुख्यमंत्री जेव्हा एखाद्या विषयाला गंभीर म्हणतात, तेव्हा त्याची चौकशी होऊन वास्तव समाजासमोर यायला हवे.”
सुप्रिया सुळे यांनी पार्थ पवारांच्या बचावार्थ केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले. “कुटुंब आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आमच्या कुटुंबात आम्ही एकमेकांविरोधातही निवडणुका लढलो आहोत. विचारधारा महत्त्वाची, कुटुंब नव्हे,” असे ते म्हणाले.
पत्रकारांनी विचारलेल्या “पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का नाही?” या प्रश्नावर पवार म्हणाले, “हा प्रश्न मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना विचारावा. मला या प्रकरणातील व्यक्तींची नावेही माहीत नाहीत. आरोप करणाऱ्यांनीच सत्य बाहेर आणावे.”
Unhen landscam case : तेव्हा… पार्थ पवारांवरही गुन्हा दाखल करू” !
सुळे म्हणाल्या होत्या, “या प्रकरणी मीडिया ट्रायल नको. पार्थ माझ्या मुलासारखा आहे; तो गैरव्यवहार करणार नाही. कागदपत्रांची सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. पार्थलाही आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. न्याय सर्वांसाठी समान असला पाहिजे.”








