After the hunger strike, the battle for political creditism starts : पेनटाकळीतील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न
Buldhana पेनटाकळी प्रकल्पातील पुनर्वसनाच्या मागणीसाठी सुरु असलेले बेमुदत उपोषण सोमवारी समोपचाराने समाप्त झाले. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार सिद्धार्थ खरात आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते हे उपोषण सोडवण्यात आले. मात्र, आता या निर्णयावर श्रेयवादाची लढाई रंगणार असल्याची चर्चा आहे.
१९९८ पासून प्रलंबित असलेल्या पेनटाकळी पुनर्वसनाच्या मागणीसाठी सहा फेब्रुवारीपासून ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सिंचन प्रकल्पाच्या खालील गावांचे पुनर्वसन नियमांनुसार शक्य नसल्याने, गावठाण स्थलांतरणाचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. यासंदर्भात माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर आणि विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्या होत्या.
Samruddhi Mahamarg : खासगी बसचा अपघात; एक ठार, २० प्रवासी जखमी
उपोषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यात ७ हेक्टर ८२ आर जागेवर ३८२ भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी १२व्या दिवशी उपोषणस्थळी लोकप्रतिनिधींनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी प्रतापराव जाधव यांनी भूमी अभिलेख विभागाला सीमांकन त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश दिले. तसेच ग्रामपंचायतीने अतिक्रमण हटवून भूखंड वाटप करावे, पोलीस निरीक्षकांनी योग्य बंदोबस्त द्यावा, आणि गावसभेच्या सहमतीने वाटप प्रक्रियेचा निर्णय घ्यावा, असे आदेश दिले.
Chandrashekhar Bawankule : ‘त्या’ दोघांच्या राजकीय आयुष्यावर प्रश्नचिन्ह लाऊ नका !
ग्रामस्थांनी दुपारी दोन वाजता लिंबू-पाणी घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, गटविकास अधिकारी संदीप मेटांगळे, ठाणेदार गजानन करेवाड यांसह विविध शासकीय अधिकारी आणि स्थानिक नेते उपस्थित होते. या निर्णयावरून राजकीय श्रेयवादाची चर्चा रंगली आहे. माजी आमदार रायमुलकर आणि विद्यमान आमदार खरात यांनी यासाठी स्वतंत्र प्रयत्न केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता खऱ्या श्रेयाचा मान कोणाला मिळणार? याची उत्सुकता लागली आहे.