Philippine Earthquake : फिलीपाईन्सला 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा तडाखा

26 people died, more than 147 injured : 26 जणांचा मृत्यू, 147 पेक्षा अधिक जखमी

Philippine : फिलीपाईन्समध्ये मंगळवारी रात्री आलेल्या 6.9 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने भीषण हाहाकार माजवला आहे. राष्ट्रीय आपत्ती संस्थेच्या माहितीनुसार, या भूकंपात आतापर्यंत किमान 26 जणांचा मृत्यू झाला असून 147 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भूकंप सेबू प्रांतातील बोगो सिटीच्या ईशान्येला सुमारे 19 किमी अंतरावर आणि 10 किमी खोलीवर स्थानिक वेळेनुसार रात्री 9.50 वाजता झाला. हादऱ्यांमुळे अनेक इमारती कोसळल्या, भूस्खलन झाले आणि मोठ्या शहरांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. सुरुवातीला सुनामीचा इशारा देण्यात आला होता, मात्र नंतर तो मागे घेण्यात आला.

Local Body Election : उद्धव ठाकरेंचे ९८ पदाधिकारी एकनाथ शिंदेंकडे!

राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी आणि व्यवस्थापन परिषदेच्या बुलेटिननुसार, किमान 22 इमारतींना मोठे नुकसान झाले आहे. सॅन रेमिजिओ येथे बास्केटबॉल खेळादरम्यान क्रीडा केंद्राचे छत कोसळल्याने तीन तटरक्षक दलाचे सदस्य मृत्युमुखी पडले. तर बोगो भागात भूस्खलन व इमारतींच्या ढिगाऱ्यात अडकून नऊ प्रौढ आणि चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून ढिगाऱ्याखाली अजूनही नागरिक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी आलेल्या धक्क्यांमुळे व अंधारामुळे बचावकार्याला मोठा अडथळा निर्माण झाला. ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्र संस्थेच्या माहितीनुसार, या भागात आतापर्यंत तब्बल 379 भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

Ladki bahini Yojana : लाडकी बहीण योजनेला सरकारचा नवा नियम

सेबूच्या गव्हर्नर पामेला बॅरिक्युआट्रो यांनी नागरिकांना शांत राहण्याचे, कोसळलेल्या व नुकसानग्रस्त इमारतींपासून दूर राहण्याचे आणि पुढील धक्क्यांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. फिलीपाईन्स पॅसिफिक “रिंग ऑफ फायर” वर वसलेले असल्याने येथे भूकंप वारंवार होतात आणि अनेकदा प्राणघातक ठरतात.