Breaking

Piyush Goyal : महाराष्ट्राकडून एक ट्रिलियन डॉलर्सचे योगदान हवे

Contribution of one trillion dollars is required from Maharashtra : केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची अपेक्षा

Nagpur विदर्भातील उद्योगांना बूस्ट देण्यासाठी आयोजित खासदार औद्योगिक महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. यावेळी केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर महाराष्ट्राकडून एक ट्रिलियन डॉलर्सचे योगदान हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंटच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात हे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, खासदार प्रफुल्ल पटेल यांचीही उपस्थिती होती.

CM Devendra Fadnavis : AI क्षेत्रातील ‘स्टार्टअप्स’ला Full Support!

भारताने औद्योगिक क्रांती ४.० ही संधी गमावून चालणार नाही असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. औद्योगिक क्षेत्राकडून त्यांच्या अपेक्षा आहेत. या खासदार औद्योगिक महोस्तव या आयोजनातून आपण विदर्भाचे खरे सामर्थ्य सादर केले आहे. आता उद्योगांच्या वाढीसाठी प्रत्यक्ष पावले उचलण्याची गरज आहे, असे गोयल म्हणाले.

विदर्भात नागपूर -बुटीबोरी दरम्यान ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ स्किल अँड लॉजिस्टिक्स तयार करण्याचा प्रस्ताव गडकरींनी दिल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या अर्थसंकल्पात देशात १०० प्लग अँड प्ले औद्योगिक क्षेत्र तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यात महाराष्ट्र आघाडीवर राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Washim Guardian Minister : वाशिमचे पालकमंत्री बदलणार; नाईक यांच्या नावाची चर्चा!

केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा वाढवत असून यामुळे रोजगार निर्मिती होत आहे. एकूणच उपभोग आधारित विकास आणि पायाभूत आधारित विकासाने दुप्पट गतीने देश प्रगती करत असल्याचे ते म्हणाले. सुरवातीला प्रस्ताविकातून एआयडी अध्यक्ष आशीष काळे यांनी यंदाचा महोत्सव अनेक एमओयू आणि वैचारिक बौद्धिक देवाण घेवाण झाल्याने यशस्वी झाल्याचे सांगितले. आयोजन समिती अध्यक्ष अजय संचेती यांनी औद्योगिक महोत्सवासाठी लाभलेल्या गडकरींच्या मार्गदर्शनाचा गौरव केला.

Advantage Vidarbha 2025 : E-Marketplace राबवणार डिजीटल साक्षरता

गडकरी म्हणजे Ideas चा भंडार!
पियुष गोयल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. त्यांनी गडकरींचा उल्लेख ‘आमचे नेते’ असा केला. गडकरी म्हणजे नवनवीन संकल्पनांचा भंडार आहेत. त्यांच्या डोक्यात एखादी कल्पना आली की ते प्रत्यक्षात उतरवतात आणि पूर्णत्वास नेतात, असं गोयल म्हणाले.