Plane passengers crashes in residential area : अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना, प्रवाशांच्या सुरक्षेबद्दल चिंता
Ahmedabad : गुजरातच्या अहमदाबादमध्ये मोठी विमान दुर्घटना घडल्याचे समोर आली आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर परिसरात हे प्रवासी विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. एअर इंडियाचं हे विमान असल्याची प्राथमिक माहिती असून या दुर्घटनेत मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. सध्या बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. सध्या या विमानात किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून त्याला प्राथमिकता देण्यात येत आहे.
या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, प्रवाशांच्या सुरक्षेची तसेच ज्या भागात विमान दुर्घटनाग्रस्त झाले तेथील रहिवासीयांच्या सुरक्षा आणि मदत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या अपघाताची माहिती गृह मंत्री अमित शहा यांनी घेतली आहे.