PM Awas Yojana : १९ हजार ८५ लोकांना आज मिळणार हक्काचं घर!

19 thousand 85 people will get their rightful house today : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेला गती; गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पहिल्या हप्त्याचे होणार वितरण

Nagpur प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतगर्त आज, शनिवार दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील घरकुल लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यातील १९ हजार ८५ लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीचे आदेशपत्र पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. हक्काचं घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या या कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण नागपूर जिल्हा परिषदेच्या आबासाहेब खेडकर सभागृहात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये देण्यात आलेल्या एकूण लक्षांक २०२२५ पैकी १९०८५ लाभार्थ्यांना मजुरी पत्र देण्यात येणार आहे. तसेच तब्बल १२८६२ लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

Ladki Bahin : लाडक्या बहिणींनी सुरू केली Co-operative Society!

या कार्यक्रमाचे आयोजन एकाच वेळी जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर देखील होणार आहे. त्या त्या ठिकाणी लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण केले जाणार आहे. जिल्हा स्तरावर आयोजित होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर उपस्थित राहणार आहेत.

घरकुल लाभासह महात्मा गांधी ग्राम रोजगार हमी योजनेतून ९० दिवसांचा मजुरीचा लाभ देण्यात येणार आहे. यापूर्वी स्वछ भारत मिशन अंतर्गत ज्यांनी लाभ घेतला नाही. अशा घरकुल धारकांना १२ हजार रुपये प्रोत्साहन निधी दिला जाईल. याचबरोबर ज्या लाभार्थ्यांकडे स्वतःची जागा नसेल अशा लाभार्थ्यांना पंडित दिनदयाल उपाध्याय योजनेतून जागा खरेदीसाठी १ लक्ष रुपये लाभ देण्यात येणार आहे.

Sanjay Nirupan : मुंबईत ‘हाउसिंग जिहाद’ हिंदूंना अल्पमतात करण्याचा डाव !

ग्रामीण भागातील निवासित प्रत्येक कुटुंबाला आपले हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे. घरकुलास पात्र असलेल्या प्रत्येक कुटुंबाला घरकुल देण्यात येत आहे. यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ देण्याचे काम सक्रियपणे सुरु आहे.