PM Kisan, Namo Kisan scheme : सरकारी योजनांतून शेतकऱ्यांना वर्षभरात २३२ कोटी

Farmers received Rs. 232 crores during the year from government schemes : दिलासा मिळाला, पण शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न कायम

Yavatmal नापिकी, दुष्काळ, वातावरणातील बदल यामुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना सातत्याने संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा स्थितीत त्यांना धीर देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो किसान महासन्मान निधी योजना सुरु केली. या दोन्ही योजनांतून यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 232 कोटींचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. परंतु, कर्जबाजारीपणाचे संकट मात्र अजूनही शेतकऱ्यांवर घोंघावत आहे. आणि त्यातूनच शेतकरी आत्महत्येसारखा प्रश्नही कायम आहे.

राज्य व केंद्र शासनाच्यावतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासोबतच त्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. विविध योजनांच्या माध्यमातून अनुदान देखील दिले जातात. सोबतच त्यांना रोख रक्कम देऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे.

Anandrao Adsul : हा कसला सामाजिक न्याय? योजनाच पोहोचल्या नाहीत!

या योजनेच्या निकषांनुसार पात्र शेतकरी कुटुंबास 2 हजार प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रतिवर्षी 6 हजार त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासा देणारी ठरली आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार पात्र असलेले सर्व शेतकरी. तसेच पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले शेतकरी देखील राज्याच्या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

Surrender of Naxalites : ३८ लाखांचे बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

केंद्राप्रमाणे राज्य शासनाच्या योजनेतून देखील प्रतिहप्ता 2 हजार याप्रमाणे प्रतिवर्षी 6 हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्यांना दोनही योजनेतून वर्षाला 12 हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध होते. जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 2 लाख 85 हजार 897 इतके पात्र शेतकरी आहेत. या सर्व शेतकऱ्यांना नमो किसान महासन्मान योजनेचा देखील लाभ दिला जातो. जिल्ह्यात पीएम किसान योजनेतून आतापर्यंत या शेतकऱ्यांना 118 कोटी 9 लाख तर राज्याच्या महासन्मान योजनेतून 114 कोटी रुपये याप्रमाणे 232 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहे.