Cyber thieves have a bad eye on farmers : पीएम किसान सन्मान निधी योजना; लिंक उघडताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन
Nagpur केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधीच्या नावाने येणाऱ्या लिंकवरुन Link शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कम रफुचक्कर होत आहे. एकीकडे आधीच शेतकरी वर्ग कर्जबाजारीसारख्या संकटांचा सामना करीत आहे. आणि आता सायबर फसवणुकीच्या Cyber Crime निमित्ताने एक नवं संकट शेतकऱ्यांवर ओढवलं आहे. सरकारने सावधगिरी बाळगण्याचं तर आवाहन केलं आहे. मात्र कायमस्वरुपी उपाययोजना करणार का, असा प्रश्न यातून उपस्थित झाला आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पी.एम. किसान योजना) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईल वर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK या msg ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत असल्याचे निदर्शनास आल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
Dhananjay Munde, Manikrao Kokate : ‘महायुतीचे दोन गुंडे, कोकाटे-मुंडे’!
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून सहा हजार व राज्य सरकार सहा हजार रुपये देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारची ही एक अभिनव योजना आहे. परंतु सायबर चोरांची बोहारी नजर आता अन्नदातांच्या खात्यावर पडली आहे. अशिक्षित शेतकऱ्यांना सायबर जाळ्यात ओढण्याचे काम सुरू झाले आहे.
शेतकऱ्यांनी मोबाईल वर PM Kisan list. APK किवा PM Kisan APK या msg ची लिंक उघडू नये किंवा या लिंकचा वापर शेतकऱ्यांनी करू नये. तसेच अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविंद्र मनोहरे यांनी केले आहे.
Harshawardhan Sapkal : फडणवीस, पवारांनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावला
वारंवार घडत आहेत घटना
शेतकऱ्यांची साबयर फसवणूक होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. विशेष म्हणजे सायबर गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. गेल्या वर्षी तळोध्यातील एका शेतकऱ्याला असेच फसवले होते. तुमच्या खात्यात चुकीने ३५ हजार रुपये आल्याचा शेतकऱ्याला फोन आला. त्यानंतर पैसे परत करण्यासाठी गुन्हेगारांनी तगादा लावला. शेवटी शेतकऱ्याने २२ हजार रुपये संबंधिताला पाठवले. पण आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याला उशिराने कळले.