3.44 lakh farmers await the benefits of the scheme : ३.४४ लाख शेतकऱ्यांमध्ये नाराजी, ऐन सणासुदीत राज्य सरकारकडून विलंब
Buldhana जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेचा २०वा हप्ता नुकताच जमा झाला असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता अद्यापही थकलेला असल्याने ३.४४ लाख शेतकरी प्रतीक्षेत आहेत.केंद्र सरकारने दिलेला ‘सन्मान’ शेतकऱ्यांच्या खात्यात वेळेवर जमा झाला असला तरी, राज्य सरकारच्या ‘महासन्मान’चा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पीएम किसान योजनेंतर्गत केंद्र सरकारतर्फे दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रुपये जमा होतात. नमो शेतकरी महासन्मान योजनेंतर्गत राज्य सरकारकडून वर्षाला ६ हजार रुपये जमा होतात. दोन्ही योजनांचे लाभार्थी प्रामुख्याने एकच असून, पीएम किसानचा हप्ता मिळाल्यावर काही दिवसांत नमो शेतकरीचा हप्ता मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना असते. मात्र, यंदा तो मिळाला नसल्याने संभ्रम आणि नाराजी पसरली आहे.
Tribal Pardhi Conference : हैदराबाद गॅझेटमध्ये आदिवासी पारधींचा उल्लेख !
बुलढाणा जिल्ह्यातील ३,४४,४०९ शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी संघटनांकडून सरकारकडे नाराजीचा सूर उमटू लागला आहे. पोळ्याचा सणही अपेक्षित सरकारी मदतीविना पार पडला.
Dharmapal Meshram : संविधानातील तरतुदींमुळे आदिवासी, भटके मुख्य प्रवाहात येऊ शकले !
केंद्र सरकारकडून वेळेवर हप्ता मिळत असताना राज्य सरकारकडून होणारा विलंब हा निवडणूकपूर्व काळात राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे. विरोधकांनी राज्य सरकारवर “शेतकऱ्यांची थट्टा” केल्याचा आरोप सुरू केला आहे. दुसरीकडे, सत्ताधारी नेत्यांनी लवकरच रक्कम वितरीत होईल, असे आश्वासन दिले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार लिंकिंग व ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रक्रिया अपूर्ण असल्यास हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते.








