PM Modi Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसाला राष्ट्रीय बेरोजगार दिन!

Youth Congress celebrated National Unemployment Day : चिखलीत युवक काँग्रेसचे आंदोलन, सरकारच्या अपयशावर संताप

Chikhali पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये देशातील दोन कोटी युवकांना दरवर्षी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप काँग्रेसतर्फे सातत्याने केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त चिखली शहर व तालुका युवक काँग्रेसतर्फे १७ सप्टेंबर रोजी जयस्तंभ चौकात राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करून अनोखे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात युवकांनी शैक्षणिक पोषाख परिधान करून “इंजिनिअर चायवाला”, “एमबीए वडा पाववाला”, “ग्रॅज्युएट फळ विक्रेता” असे फलक लावून प्रतिकात्मक दुकाने थाटली. चहा, वडापाव, मक्याची कणसे, फळे विकून त्यांनी शिक्षणानंतरही नोकरीसाठी भटकंती करावी लागते, आणि शेवटी किरकोळ व्यवसाय करून पोट भरावे लागते, ही वस्तुस्थिती मांडली. जयस्तंभ चौकात जमलेल्या शेकडो तरुणांनी बेरोजगारीविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या रोजगार धोरणाविरोधात संताप व्यक्त केला.

Fake birth certificate case : जन्म दाखल्यातील बनावट प्रकरण; 41 आरोपींवर चार्जशीट, 1300 पानांचे आरोपपत्र

या आंदोलनात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे, तालुका अध्यक्ष अंबादास वाघमारे, विधानसभा समन्वयक प्रा. राजू गवई, तसेच कुणाल बोंद्रे, अतहरोधीन काझी, विलास कंटूले, जय बोंद्रे, कैलास खराडे, मिलींद पालवे, रामेश्वर भुसारी आदींसह मोठ्या संख्येने युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Harshvardhan Sapkal : कृषीमंत्री बेपत्ता आहेत, आपण त्यांना पाहिले का?

शहर युवक काँग्रेस अध्यक्ष रिक्की काकडे म्हणाले की, “देशात वाढती बेरोजगारी ही सर्वात गंभीर समस्या आहे. शिक्षित तरुणांना रोजगार न मिळणे हे थेट मोदी सरकारच्या अपयशाचे द्योतक आहे. मागील दहा वर्षांत रोजगाराच्या नावाखाली फक्त खोटे आश्वासन दिले गेले. आज लाखो तरुण कामाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचा संताप सरकारकडे पोहोचवण्यासाठीच मोदी यांचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा केला.”