PM Modi Nagpur Visit : पंतप्रधान मोदी संघभूमित, स्मृति मंदिराला भेट!

Prime Minister Narendra Modi visits RSS office : सरसंघचालक, गडकरी, फडणवीसही होते सोबत

Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवार दि. ३० मार्चला रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्यसरसंघचालक डॉ. केशवबळीराम हेडगेवार यांच्या स्मृतिंना अभिवादन केले. तसेच द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाला वंदन केले.

पंतप्रधानांसोबत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत Mohan Bhagwat , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis, संघाचे वरीष्ठ नेते भय्याजी जोशी यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे पंतप्रधान पदावर असताना दोनवेळा रेशीमबागच्या स्मृती स्थळाला भेट देणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. पंतप्रधान म्हणून रेशीमबागचा हा त्यांचा दुसरा दौरा आहे. २०१४ मध्ये त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांनी पहिल्यांदा रेशीमबागला भेट दिली होती.

Belora Airport : अमरावती विमानसेवेची गुढी उभारलीच नाही!

विशेष म्हणजे १७ मार्च २०२५ ला महाल येथे मोठ्या प्रमाणात दंगल पेटली होती. या दंगलीचे देशभर पडसाद उमटले. त्यानंतर जवळपास आठवडाभर स्थानिकांना कर्फ्यू सहन करावा लागला. हा कर्फ्यू पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यापर्यंत वाढवला जाणार अशी चर्चा होती. या पार्श्वभूमीवर दंगलीपासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या रेशीमबागला पंतप्रधानांनी भेट देणे आश्चर्याचे मानले जात आहे.

पूर्वनियोजित दौऱ्यानुसार पंतप्रधान माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमाला येणार होतेच. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्मृती मंदिराला आणि दीक्षाभूमीला ते भेट देणार असल्याचे नंतर ठरले, असे बोलले जात आहे.

Jansangharsh Urban Fund : अरे बाप रे! ५ हजार ७७३ पानांची Chargesheet?

दरम्यान, रेशीमबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी भगव्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी घोषणा दिल्या. त्यानंतर रेशीमबाग येथे संघ कार्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि संघाचे वरीष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष म्हणजे मोदींच्या दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण मार्गावर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला आहे.