PM Modi’s mother abused : मोदीजी आणि त्यांच्या आईचा अपमान म्हणजे भारतीय लोकशाहीचा अपमान – आमदार रणधीर सावरकर

MLA says it is an insult to Indian democracy : जनता काँग्रेसला माफ करणार नाही, तीव्र प्रतिक्रिया

Akola बिहारमधील ‘व्होट अधिकार यात्रा’दरम्यान काँग्रेसच्या नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या स्व. आई हिराबेन मोदी यांच्याविषयी अश्लाघ्य वक्तव्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कृत्याचा भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि आमदार रणधीर सावरकर Randhir Sawarkar यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.

आमदार सावरकर म्हणाले, “राजकीय मतभेद असू शकतात, विचारधारांमध्ये संघर्ष असू शकतो. पण पंतप्रधान पदावर विराजमान असलेल्या नरेंद्र मोदीजी आणि त्यांच्या स्वर्गीय मातेसंदर्भात अश्लाघ्य भाषा वापरणे हे अत्यंत निंदनीय आहे. हा प्रकार केवळ मोदीजींचा नाही, तर भारतीय लोकशाहीचा आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा अपमान आहे.”

OBC Reservation : आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ आक्रमक !

त्यांनी पुढे सांगितले, “भारत ही लोकशाहीची जननी आहे. शत्रूच्या आईलाही मान देणाऱ्या संस्कृतीत काँग्रेसने एका आईचा केलेला अपमान हा ‘मातृदेवो भवः’ या आपल्या शिकवणीला काळिमा फासणारा आहे. हिंदू संस्कृतीचा मान करणाऱ्या या देशात असे कृत्य सहन केले जाणार नाही. मायबाप जनता काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना याबाबत कठोर धडा शिकवेल.”

सावरकर यांनी तामिळनाडू व तेलंगणातील राजकीय वक्तव्यांवरही निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, “तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि तेलंगणातील काँग्रेस नेते, जे बिहार तसेच राजस्थानमधील प्रवासी व्यापारी व कामगारांविषयी अपमानास्पद भाष्य करतात, त्यांनी आत्मपरीक्षण करावे. तेलंगणात ‘गो बॅक राजस्थानी’ असे कॅम्पेन चालवून राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेस देशाच्या संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीला धक्का पोहोचवत आहे. हे धोकादायक तत्त्व आहे आणि यापासून सावध राहणे आवश्यक आहे.”

Laxman Hake : लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा, मनोज जरांगेंना थेट इशारा;

तेलंगणात काँग्रेसविरोधात भाजपने केलेल्या आंदोलनानंतर काँग्रेसला माघार घ्यावी लागली, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. “काँग्रेसची ही भूमिका दुर्दैवी असून जनता कधीही अशा प्रवृत्तीला सहन करणार नाही,” असे सावरकर यांनी ठामपणे सांगितले.