Breaking

PM Narendra Modi Dream Project : नागपूर जिल्ह्यात ७५ हजारावर ‘लखपती दिदी’!

More than 75 thousand ‘Lakhpati Didi’ in Nagpur district : पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला भरभरून प्रतिसाद

Nagpur बचत गटातील महिलांना स्वतःच्या पायावर उभ्या रहाव्या. त्यांची ओळख लखपती अशी व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ड्रीम प्रोजेक्ट’ योजना लागू केली होती. नरेंद्र मोदी यांच्या या ‘लखपती दीदी’ योजनेला नागपूर जिल्ह्यातून भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. नागपूर जिल्ह्यात ७५ हजार ९२३ लखपती दीदी झाल्या असून या वर्षात हा आकडा ८५ हजारांच्या पार जाण्यावर भर देण्यात येत आहे.

उमेद अभियान महाराष्ट्रात या योजनेवर टप्प्या-टप्प्याने काम करत आहे. यातून महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून त्यांना लखपती करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. तळागाळातील कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्र्य कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते.

NCP Sharad Pawar : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विसरायचेय अपयश!

त्यापैकीच एक म्हणजे राज्यात ‘महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ या नावाने हे अभियान राबविले जात असताना त्याचे ‘उमेद’ असे नामकरण करण्यात आले. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दिष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून आर्थिक बळ देत आहे. नागपूर जिल्ह्यात १९ हजार २९७ महिला बचत गट असून यात सुमारे ९९ हजार ३८९ महिला सदस्य आहेत.

Uddhav Balasaheb Thackeray : सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत केंद्र सुरू ठेवा

नागपूर जिल्ह्याला २०२४-२५ या वर्षात ७५ हजार ९२३ महिला लखपती दीदी झाल्या आहेत. गेल्या वर्षात बचत गटांच्या ११ हजार ३५० महिलांना कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यातील १० हजार ५७२ महिलांना स्वयंरोजगारासाठी ३३ कोटी १५ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. एकूणच पंतप्रधानांच्या या योजनेसाठी प्रशासन जोरात कामाला लागल्याचे चित्र आहे.