Eight days deadline for inquiry : वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरण
Wardha वाघोलीच्या जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरण आता चांगलेच गाजत आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. पण चौकशीची व्यवस्थाच करण्यात आली नव्हती. आता विशेष तपास समिती संपूर्ण चौकशी करणार आहे. या समितीला चौकशी पूर्ण करण्यासाठी फक्त आठ दिवसांचा वेळ देण्यात आलेला आहे.
हिंगणघाट पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या वाघोली येथील जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. आधीच समिती स्थापन करण्यात बराच विलंब झाल्याने आठ दिवसांत चौकशी पूर्ण करावी. त्यानंतर अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे.
Preparation for by-elections of Gram Panchayats : ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरू
या त्रिसदस्यीय समितीमध्ये दुसऱ्या पंचायत समितीतील गट शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व शालेय पोषण आहाराचे लेखाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता ही चौकशी समिती शाळेत धडकणार आहे. ती समिती मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व शाळा व्यवस्थापनाची चौकशी तर करणारच आहेच. पण समितीसोबतच पोषण आहार अधीक्षकांचीही चौकशी होणार का ? असाही प्रश्न उपस्थित होणार असून, कारवाईकडे लक्ष लागले आहे.
निलंबन रद्द होणार का?
पोषण आहारातूनच विषबाधा झाल्याची सुरुवातीपासून ओरड होत आली आहे. प्राथमिक चौकशीत मुदतबाह्य तेलाचे पाकीट जप्त करण्यात आले. पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापकांना निलंबित केले. शाळा व्यवस्थापन समितीनेही यावर आक्षेप घेत निलंबन रद्द करण्याची मागणी केली. सोबत पोषण आहार अधीक्षक अशोक कोडापे यांच्यावरही कारवाईची मागणी पुढे आली, पण अद्यापही कारवाई झाली नसल्याने रोष आहे.
Amravati Police claims of NO Pendency : पोलिसांकडे तक्रारींची ‘नो पेंडन्सी’?
निवृत्तीपूर्वी कारवाई
पोषण आहार अधीक्षकही दोषी आहे. त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी झाल्याने अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवालाकडे बोट दाखविण्यात आले. परंतु, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोषण आहार अधीक्षक आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असल्याने या प्रकरणात चालढकल होत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. एकदा सेवानिवृत्ती आटोपली की यातून नामेनिराळे होण्याचा खटाटोप चालविल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.