Breaking

Poisoning case : आता कामगारांचे कंपनी विरोधात आंदोलन

 

Workers protest against the company : कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले

Akola नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीमधील गोल्डन फायबर या कंपनीमध्ये रविवारी विषबाधा झाली. या घटनेनंतर सोमवारी शेकडो कामगारांनी कामबंद आंदोलन केले. व्यवस्थापनाच्या दडपशाही व हुकूमशाहीविरोधात महिला व पुरुष कामगारांनी सोमवारी एकजूट दाखविल्याने कंपनी व्यवस्थापनाचे चांगलेच धाबे दणाणले.

कंपनी व्यवस्थापन, पोलिस आणि कामगार विभागाचे साटेलोटे असल्याने वारंवार याठिकाणी कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला. कंपनीतील अकरा अत्यवस्थ कामगारांवर अजूनही खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून रविवारी

Wardha District Bank : जिल्हा बँकेसाठी धावून आली शिखर बँक!

रविवारी सकाळी सामान्य शिफ्टमधील दोनशे कामगारांनी पाणी प्यायल्याने त्यांना उलटी, मळमळ व पोटदुखी होत असल्याने व्यवस्थापक रावत यांनी केवळ कंपनीची बदनामी होऊ शकते. यासाठी विषबाधा झालेल्या अनेक कामगारांना कंपनीमध्ये डांबून ठेवले. तर ज्यांना जास्त त्रास सुरू होता, त्यांना थेट घरी पाठविण्यात आले.

माध्यमे किंवा जिल्हा रुग्णालयापर्यंत जाऊ नये, असा अलिखित आदेश कंपनीने दिला. कंपनीचे नाव समोर आल्यास कामगारांना कामावरून कमी करण्याचा धमकीवजा इशाराही रावत याने कामगारांना दिला होता. मात्र ही बाब मनसेचे पप्पू पाटील यांना माहीत पडल्यानंतर प्रकरणाचे बिंग फुटले.

दोनशेपैकी काही रुग्ण घरी परतले होते. त्यांनी गावातच उपचार घेतले. एकशेतीस कामगार जिल्हा सामान्य रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. सर्वांवर प्राथमिक उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर अद्यापही ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी घटनेच्या निषेधार्थ तसेच कंपनी व्यवस्थापनाच्या दडपशाही व हुकूमशाही विरोधात शेकडो कामगारांनी एकजूट दाखवत कामबंद आंदोलन केले.

Suspense on Guardian Minister : प्रफुल्ल पटेल ठरवतील गोंदियाचा पालकमंत्री!

महिला कामगारांशी बोलताना अश्लील भाषेचा वापर करणाऱ्या, तसेच कामगारांची पिळवणूक करणाऱ्या व्यवस्थापक जे. एस. रावत यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी यावेळी संतप्त कामगारांनी केली. मनसे कामगार संघटनेचे सरचिटणीस केतन नाईक, पप्पू पाटील यांच्या नेतृत्वात कामबंद आंदोलन करण्यात आले. कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा झाल्यानंतर दुपारी कामगार कामावर रुजू झाले. मंगळवारी जिल्हा कामगार अधिकारी यांच्या दालनात कामगार

कॅन्टीनमधून विषबाळा
गोल्डन फायबर कंपनीमध्ये कामगारांसाठी कॅन्टीन असून या कॅन्टीनमध्ये सकाळच्या सर्व कामगारांनी नाश्ता व जेवण केले व त्यानंतर पाणी प्यायले. पाणी पिल्यानंतर सर्व कामगारांना उलटी, पोटदुखी, मळमळचा त्रास सुरू झाला. मात्र, काही कामगारांचे असे म्हणणे आहे की, पाण्यामुळे जर हा त्रास झाला असता तर इतर कंपनीमध्येसुद्धा हा प्रकार होऊ शकला असता. त्यामुळे अन्नातूनसुद्धा विषबाधा होऊ शकते, असा संशय काही कामगारांनी व्यक्त केला आहे