Police Commissioner : कुत्रा फिरवताय.. सावधान ! तोंडावर जाळी आणि पट्ट्यावर मालकाचे नाव लिहा !

Dog muzzles and owner’s name on leashes are mandatory : कुत्र्यांचा उपद्रव झाल्यास नागरिकांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधावा

Nagpur : कुत्रे पाळण्याची आवड लहानापासून ते मोठ्यांपर्यंत आणि गरीबांपासून ते श्रीमंतांना असते. हो लोक सकाळ संध्याकाळ लाडक्या कुत्र्यांना फिरायला बाहेर नेतात. पण आता बाहेर कुत्रा फिरवताना सावधानी बाळगण्याची गरज आहे. पाळीव कुत्र्यांना घराबाहेर फिरवताना त्यांच्या तोंडावर जाळी लावणे नागपूर पोलिसांना बंधनकारक केले आहे. सोबत कुत्र्याच्या पट्ट्यावर मालकाचे नाव आणि पत्ता लिहीणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

नागपूर शहरातील नागरिकांना पाळीव कुत्र्यांना रस्त्यावर फिरवण्यासंदर्भात नागपूर पोलिसांनी उपरोक्त आदेश जारी केले आहेत. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घातल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागपूरचे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी आदेश देताना सांगितले की, पाळीव कुत्र्यांचा उपद्रव झाल्यास नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तोंडावर जाळी आणि गळ्यात पट्टा व पट्ट्यावर मालकाचे नाव न आढळल्यास त्याला मोकाट कुत्रा समजून कारवाई करण्यात येईल. काही कुत्र्यांचे मालक घराच्या दाराबाहेरच कुत्र्यांना सोडून देतात, हा प्रकारही यापुढे चालणार नाही, असेही पोलिस आयुक्त डॉ. सिंगल यांनी सांगितले आहे.

Manoj Jarang’s Agitation : जरांगेंच्या आंदोलनावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ‘वेट अॅंड वॉच’

गेल्या काही दिवसांत नागपुरात पाळीव कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या. वर्धमान नगरात चार वर्षीय मुलगी घराच्या बाहेर खेळत असताना तिच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. यात ती चांगलीच जखमी झाली. आजुबाजूच्या लोकांना लागलीच धाव घेत काठ्या आणि दगडं मारून कुत्र्यांना पिटाळून लावले. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता. कुत्र्यांच्या अशाच हल्ल्यांमध्ये पाच जण मृत्युमुखी पडले आहेत.

Mohan Bhagwat : विश्वगुरू होण्यासाठी संघाची वाटचाल ; मोहन भागवत

काही पाळीव कुत्र्यांनी घरातील सदस्यांवरच हल्ला केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्या पृष्ठभूमीवर पोलिसांनी नवीन नियम जारी केले आहेत. हे नियम न पाळणाऱ्या कुत्र्यांच्या मालकांवर कारवाई केली जाणार आहे. सन २००८ मध्ये नागपुरात मोकाट कुत्र्यांची संख्या १० हजार होती. ही संख्या आजमितीस एक लाखाच्या वर गेली आहे. ही संख्या चिताजनक आहे. त्यामुळे आता मोकाट कुत्र्यांवर कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नियमावली जारी केली आहे. त्याचे पालन नागपूर पोलिसांकडून केले जात आहे, असे पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी सांगितले.