Police Recovery of one crore fine in two days : साडेअकरा हजार वाहनचालकांवर कारवाई
Police शहरातील बिघडलेली कायदा व सुव्यवस्था पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी 30 ते 31 डिसेंबरला विशेष मोहिम राबवली. या दोन दिवसांत पोलिसांनी उपराजधानीत तब्बल 11 हजार 463 जणांनी वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याचे समोर आले. यात मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्या 161 गुन्ह्यांचा समावेश आहे. वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांकडून पोलिसांनी 1 कोटी 70 लाख 7 हजार 701 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दारु पिऊन वाहन चालविणे, सिग्नल मोडणे, हेल्मेट न घालणे यासह इतर नियम मोडण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांनी नववर्षाच्या मध्यरात्री शहरातील विविध भागात ही कारवाई केली आहे. नागपूर पोलिसांनी ऍथर्टीफर्स्ट’च्या निमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक विभाग, स्थानिक पोलीस व गुन्हे शाखा यांचा विविध भागात पहारा होता. ठिकठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी मद्यप्राशन करुन वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली होती.
मद्याच्या नशेत वाहने चालविण्यामुळे गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी मद्यप्राशन करुन वाहने चालवू नये, असे आवाहन केले होते. तरीही शहरात ‘थर्टी फर्स्ट’ साजरा करण्यासाठी बाहेर पडलेल्या अनेकांनी मद्याच्या नशेतच वाहने चालविली. 15 पोलीस निरीक्षकांसह 350 वाहतूक पोलीस बंदोबस्तावर होते. जवळपास 60 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. तरीही दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 161 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली.
वाहतूक परिमंडळ ‘ड्रंकन ड्राईव्ह’ चालान दंड
एमआयडीसी 17 788 744450
सोनेगाव 12 1407 1235000
सीताबर्डी 7 1336 1244051
सदर 17 986 930050
कॉटन मार्केट 13 1018 955500
लकडगंज 14 1359 1282500
अजनी 14 1223 1177550
सक्करदरा 26 1119 1063000
इंदोरा 18 1360 1255900
कामठी 23 867 819700
एकूण 161 11463 10707701