Breaking

Political events : दिल्लीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींची शक्यता !

Important meeting with Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi : एकनाथ शिंदे, अमित शाह, नरेंद्र मोदींशी महत्त्वपूर्ण बैठक

New Delhi महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून आगामी राजकीय समीकरणांवर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिंदे आज दुपारी अमित शाह यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करणार असल्याची माहिती आहे. गेल्या आठवड्यातही शिंदे यांनी दिल्लीचा अचानक दौरा केला होता. ही एक आठवड्यातील त्यांची दुसरी दिल्ली वारी आहे, त्यामुळे या भेटी केवळ सदिच्छा भेटी नसून त्यामागे ठोस राजकीय हेतू असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Ladki bahin yojana : जिल्ह्यातील ५१ हजार लाडक्या बहिणींची ‘ओवाळणी’ होल्डवर!

प्राप्त माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ फेरबदल, आणि शिवसेनेच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर या बैठकांना विशेष महत्त्व आहे. परिणय फुके यांच्या शिवसेनेविषयीच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला तणावही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीमधील संबंधांवरही या बैठकीचा प्रभाव पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला पोहोचले. आज ते पुन्हा मुंबईत परतणार आहेत. या काही तासांच्या दौऱ्यात शिंदे भाजपच्या सर्वोच्च नेत्यांशी चर्चा करून एनडीएतील महत्त्वाच्या विषयांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 6 ते 8 ऑगस्टदरम्यान दिल्ली दौऱ्यावर आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचा एक दिवस आधीचा दौरा अधिकच चर्चेत आला आहे. ठाकरे दिल्लीत त्यांच्या खासदारांसोबत बैठक घेणार असून, राहुल गांधी यांच्या दुपारच्या जेवण कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत.

Judiciary : राजकीय नियुक्त्यांमुळे न्यायव्यवस्था कोलमडून पडेल

याआधी देखील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौरा केला होता. आता पुन्हा होत असलेल्या या बैठका म्हणजे फक्त औपचारिकता नाही, तर त्यामागे महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचे बदल घडवण्याचा संकेत असल्याचे जाणकारांचे मत आहे. शिंदे यांच्या भेटींनंतर भाजप-शिवसेनेतील संबंध, मंत्रिमंडळ फेरबदल, आणि आगामी निवडणुकांसाठी युतीची दिशा स्पष्ट होण्याची शक्यता आहे.