Breaking

Akola Municipal Corporation : निवडणुकीच्या तोंडावर झाली स्वच्छ व सुंदर शहराची आठवण !

Political parties trying to impress voters by clean city campaign : मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे राजकीय फंडे

Akola आगामी महापालिका निवडणुकीच्या उद्देशाने इच्छुक उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार मोहल्ला क्लिनिक अभियान राबवत आहेत. त्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे.

सामाजिक जाणीवेतून वेगवेगळे उपक्रम राबविणार्‍या ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाच्यावतीने दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी “मोहल्ला क्लिनिंग अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाची सुरुवात १९ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. अकोला शहराची कधीकाळी देशभरात “स्वच्छ आणि सुंदर शहर” म्हणून ओळख होती. त्या काळात नगराध्यक्ष विनयकुमार पाराशर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील स्वच्छतेचे अनुकरणीय उदाहरण निर्माण झाले होते.

MLA Manoj Kayande : चोखामेळांच्या जन्मोत्सवात रंगला राजकीय आखाडा !

अनेक महापालिका व नगरपालिकांचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अकोल्याचा अभ्यास करण्यासाठी येथे येत असत. मात्र, काळाच्या ओघात शहराच्या या ओळखीवर ग्रहण लागले आहे. आज शहर दररोज हजारो टन कचरा व प्लास्टिक प्रदूषणाचा सामना करत आहेत. स्वच्छतेची दुरवस्था झाली असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे शहर संघटक नीलेश देव यांनी केला आहे.

मनपा निवडणूक आणि स्वच्छ, सुंदर शहराची आठवण
ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व नीलेश देव मित्र मंडळाने पुढाकार घेतला आहे. या मोहल्ला क्लिनिंग अभियानात महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाला सहकार्याकरीता आवाहन करण्यात आले आहे. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविल्या जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पाच वर्षांत शहरातील स्वच्छतेची आठवण झाली नाही. आणि आता निवडणुकीच्या तोंडावर स्वच्छ व सुंदर अकोला शहराची आठवण कशी झाली, असा प्रश्नही विरोधी पक्षातील पदाधिकारी उपस्थित करू लागले आहेत.

Wardha Police : वर्धा जिल्ह्यात मुलींची छेडखानी वाढली !

नागरिकांना सहभागी होण्याच्या आवाहन
मोहल्ला क्लिनिंग अभियानात पर्यावरणप्रेमी नागरिक, सामाजिक व धार्मिक संस्थांनी सहभागी व्हावे. शहराच्या स्वच्छतेसाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन नीलेश देव मित्र मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते नीलेश देव यांनी केले आहे.