Breaking

Politics in gram panchayat : ग्रामपंचायत अधिकाऱ्याची बदली रोखण्यासाठी आत्मदहनाचा इशारा!

Division among members over transfer of Gram Panchayat officer : बदलीसाठी सरपंच, उपसरपंच व ९ सदस्यांचा आग्रह; ४ सदस्यांचा विरोध

Sakharkherda ग्रामपंचायत अधिकारी ज्ञानेश्वर चनखोरे यांच्या बदलीसाठी सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन आत्मदहनाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे, त्यांच्या बदलीस विरोध करणाऱ्या चार सदस्यांसह काही नागरिकांनी बदली झाल्यास आत्मदहन करण्याची चेतावणी दिली आहे.

सरपंच ज्योती अमित जाधव यांनी कारभार हाती घेतल्यापासून ग्रामविकास अधिकारी व त्यांच्यात समन्वय दिसून येत नाही, असा आरोप करण्यात आला आहे. चनखोरे हे नियमित ग्रामपंचायतीत उपस्थित राहत नाहीत, घरकुल बांधकामांचे हप्ते वितरित करत नाहीत, ग्रामस्थांना वैयक्तिक कामासाठी वेठीस धरतात, घरकुल योजनेचे नियमांनुसार प्रस्ताव सादर करत नाहीत, १५ व्या वित्त आयोगातील तसेच इतर विकासकामात कुचराई करतात, असेही आरोप करण्यात आले आहेत.

Devendra Fadnavis : काय सांगता! ‘देवाभाऊ’च्या नावाने चक्क पतसंस्था?

हे आरोप सरपंच ज्योती अमित जाधव, उपसरपंच अंकिता संग्रामसिंह राजपूत, माजी सरपंच दाऊद कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य गंगुबाई कमलाकर गवई, सुरय्याबी मुस्तफा शहा, लिलाबाई श्रीपत ठोके, सय्यद रफीक, शेख आयुब कुरेशी, शेख युनुस शेख यासीन, उल्हास देशपांडे, शारदा प्रविण पाझडे, कौसल्याबाई त्र्यंबक मंडळकर व देवानंद खंडागळे यांनी केले आहेत. या ११ पदाधिकाऱ्यांनी १५ ऑगस्टपूर्वी बदली न झाल्यास जिल्हा परिषदेसमोर १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.