Breaking

Sudhir Mungantiwar : लाडक्या बहीणींच्या तक्रारीची सुधीर मुनगंटीवार यांनी लगेच घेतली दखल !

Pollution from coal plants of WCL and CSTPS will be reduced in a month : एका महिन्यात कमी होणार डब्ल्यूसीएल आणि सीएसटीपीसच्या कोल प्लांटचे प्रदूषण

Chandrapur WCL and CSTPS : डब्ल्यूसीएल (वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमीटेड) आणि सीएसटीपीसमुळे (चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन) चंद्रपूरकरांना मोठ्या प्रदूषणात जगावे लागत आहे.येथील प्रदूषण संपवण्यासाठी आता राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार सरसावले आहेत. यासंदर्भात काल शुक्रवारी त्यांनी डब्ल्यूसीएल आणि सीएसटीपीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली.

आमदार मुनगंटीवार म्हणाले, डब्ल्यूसीएल आणि सीएसटीपीएसचा एक संयुक्त कोल प्लांट आहे. तेथून मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. तेथे तुषार यंत्रणा लावली आहे. पण या यंत्रणेच्या संदर्भात लाडक्या बहीणींनी तक्रार केली. ‘तुम्ही येता तेव्हा तुषार यंत्रणा सुरू होते. पण नंतर बंद होते.’, असे बहीणी म्हणाल्या. त्यामुळे यासाठी आता पाच ते सात लोकांची समिती तयार करायची. ही समिती ही सर्व यंत्रणा मॉनीटरींग करेल. कोल प्लांटमध्ये होणारा आवाज सर्वोच्च न्यायालयाने सुचवलेल्या मानकांपेक्षा जास्त आहे की कमी आहे, याचे प्रमाणपत्र उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत द्यावे.

AI Policy Taskforce : AI धोरण ठरवण्यात महाराष्ट्र देशात पहिला !

याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची व्यवस्था प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सुचवली आहे. त्याचप्रमाणे करावी त्याचा एक स्क्रीन प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये लावावा आणि दुसरा स्क्रीन त्या प्रिमायसेसच्या बाहेर लावावा. एअर पोल्यूशन मोजणारी यंत्रणासुद्धा लावावी लागेल. जेणेकरून एअर पोल्यूशन किती आहे, याची माहिती आपल्याला मिळत राहील. त्या यंत्रणेचा खर्च डब्लूसीएल देईल आणि डब्ल्यूसीएलची परिस्थिती नसेल, तर प्रदूषण नियंत्रण मंडळाने ती यंत्रणा लावावी. त्यांचा बजेट एका छोट्या राज्याइतका म्हणजे तब्बल पाच हजार कोटींचा आहे, याची जाणीव आमदार मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना करून दिली.

Social Welfare Department : विद्यार्थ्यांची उपासमार करणाऱ्या कंत्राटदाराला दंड !

डब्ल्यूसीएलच्या अधिकाऱ्यांना खडसावले
डब्ल्यूसीएल यंत्रणा लावत नसेल तर डीपीडीसीकडे अर्ज करा, अशी सूचना आमदार मुनगंटीवार यांनी केली. यासाठी साधारणतः दीड कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. आणि जर एअर पोल्यूशन मोजणारी यंत्रणा लावली नाही, तर खाण बंद करण्याचे आदेश दिले जातील, असेही आमदार मुनगंटीवार यांनी खडसावून सांगितले. अन्यथा जमा केलेली अनामत रक्कम एक कोटी जप्त केली जाईल. असा इशाराही आ.सुधीर मुनगंटीवार यांनी डब्ल्यूसीएलच्या अधिकाऱ्यांना दिला.