Breaking

Prahar Janshakti : जिल्हाधिकारी कार्यालयातच ठोकला मुक्काम!

Protest against false crop harvest reports : खोट्या पीक कापणी अहवालाविरोधात प्रहार जनशक्तीचे आंदोलन

Amravati खोट्या पीक कापणी प्रयोगाद्वारे खोटी आणेवारी लावून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (१३ मे) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत मुक्काम आंदोलन छेडले. शेतकऱ्यांसोबत संतप्त पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी दालनात धडक दिली.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांचा मुद्दा ऐकून घेतला. त्यानंतर बुधवारी (१४ मे) जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

Sanjay Khodake, Sulabha Khodake : लाखो टन राख उठतेय नागरिकांच्या जीवावर!

याआधीही प्रहारच्या नेतृत्वाखाली भातकुली तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी पालकमंत्र्यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. मात्र, खोट्या अहवालासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, अशी तक्रार आंदोलकांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचा निष्कर्ष ‘आणेवारी अहवालाच्या’ माध्यमातून शासनाकडे पाठवला जातो. त्याच अहवालाच्या आधारे नुकसान भरपाई, पीक विमा आणि इतर शासकीय योजना राबवल्या जातात. मात्र, खोटी आणेवारी दाखवून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला.

या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष छोटू वसु महाराज, भातकुली तालुका अध्यक्ष गजानन भूगुल, महानगर प्रमुख बंटी रामटेके, प्रशांत व नितीन शिरभाते, विशुद्धानंद जंवजाळ, तेजस शिरभाते, सचिन माथुरकर, सागर बोबळे, सुनील खत्री यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Youth Congress : युवक काँग्रेसकडे बॅनर, पोस्टरचेही पैसे नाहीत!

प्रहार पक्षाच्या प्रमुख मागण्या —

खोट्या आणेवारीस जबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत

शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई व पीक विमा दिला जावा

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन तात्काळ वितरित करावे

भाडे भत्ता घेणारे परंतु मुख्यालयी उपस्थित नसलेले कर्मचारी दोषी ठरवावेत