Protest against the Municipal Council administration : कायदेशीर हॉस्पिटलवर कारवाई न झाल्याचा संताप
Buldhana मलकापुर शहरातील चाळीसबिघा परिसरात परवानगीशिवाय उभारण्यात आलेल्या हॉस्पिटलच्या बेकायदेशीर बांधकामावर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ ३० एप्रिल रोजी अक्षय्यतृतीयाच्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने घागर पूजन करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांनी नगर परिषद कार्यालयासमोर घागर पुजून आणि नैवेद्य दाखवून हे आंदोलन केले. “निष्क्रिय प्रशासनामुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्यांना पाठीशी घातले जात आहे,” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
Reshuffle in Congress body : शेगाव तालुका व शहराध्यक्ष पदासाठी लॉबिंग शिगेला
डॉ. विकेत जैन यांनी चाळीसबिघा परिसरात उभारलेले ‘शांती आरोग्यम हॉस्पिटल’ नगर परिषदेकडून कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बांधण्यात आले आहे. या टोलेजंग इमारतीस कोणतीही बांधकाम परवानगी न मिळाल्याने ती पूर्णपणे अनधिकृत आहे. २७ डिसेंबर २०२४ पासून अजय टप यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी, निवेदने आणि पुरावे सादर करून सातत्याने कारवाईची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाहीत.
प्रभारी मुख्याधिकारी प्रशांत शेळके यांनी काही महिन्यांपूर्वी संबंधित डॉक्टरला एक महिन्याच्या आत बांधकाम जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. मात्र, कालावधी संपल्यानंतरही कार्यवाही झाली नाही. त्यानंतर नियुक्त झालेल्या कायम मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी त्या आदेशाला दुजोरा न देता, संबंधित डॉक्टरला कागदपत्रे सादर करण्यासाठी पत्र दिले. यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येतो.
Bhendwal Ghatmandani : शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा, पावसाचा धोका
अजय टप यांनी याआधीही विविध स्तरांवर आंदोलने केली असून, विभागीय आयुक्तांपासून मंत्रालयापर्यंत तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध अनोख्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. यावेळी अजय टप यांनी सांगितले की, “नगर परिषद प्रशासन मुद्दाम दुर्लक्ष करीत आहे. या बेकायदेशीर बांधकामावर त्वरित कारवाई न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.