Breaking

Sanjay Puram : आमदारांच्या घरापुढे पेटवली मशाल!

Prahar Protests by lighting torches in front of MLA’s house : प्रहारचे आंदोलन; शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढा

Gondia शेतकऱ्यांचे कर्जमाफ करा, हमीभाव द्या, दिव्यांगांना मानधन मिळू द्या… अशा ज्वलंत मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने आमगाव देवरी विधानसभेचे आमदार संजय पुराम यांच्या घरासमोर तीव्र मशाल आंदोलन केले. हातामध्ये प्रखरतेने पेटवलेला टेंभा, गळ्यात निळा गमछा आणि हातात भगवा झेंडा घेऊन कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते.

प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मागण्यांसाठी झगडताना दिसले. त्यांनी जोरदार घोषणा देत आमदार संजय पुराम यांच्यावर टीका केली की, “जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ते अपयशी ठरले आहेत.” आंदोलनाच्या केंद्रस्थानी शेतकऱ्यांची १०० टक्के कर्जमाफी, शेतीमालाला हमीभाव मिळावा, पेरणीपासून कापणीपर्यंत मनरेगाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि दिव्यांग नागरिकांना दरमहा सहा हजार रुपये मानधन देण्यात यावे या प्रमुख मागण्या होत्या.

Akola Airport : अमरावती विमानतळाला अकोल्यातून विरोध!

संध्याकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या मशाल मोर्च्याने रात्रीच्या अंधारातही लढ्याचा तेजस्वी प्रकाश पसरवला. आंदोलकांनी “शेतकऱ्यांच्या न्यायासाठी रस्त्यावर आलो आहोत”, “दिव्यांगांचा अपमान सहन करणार नाही”, “आमदार झोपेत आहेत, आम्ही जागे आहोत” अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. मात्र आंदोलन शांततामय पद्धतीने पार पडले. प्रहारचे कार्यकर्ते शिस्तबद्ध आणि निर्धाराने आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.

Amravati Airport : ऑक्टोबरपर्यंत नाईट लँडिंगची शक्यता!

या आंदोलनावेळी प्रहार पक्षाचे स्थानिक नेते म्हणाले, “आमदार संजय पुराम यांनी निवडून आल्यानंतर जनतेच्या मूळ प्रश्नांकडे पाठ फिरवली आहे. त्यांनी शेतकरी, मजूर, दिव्यांग यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले आहे. जर लवकरात लवकर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर लढा अधिक तीव्र करण्यात येईल.”