Pension for MLAs and MPs, then why not for teachers? : प्रहार शिक्षक संघटनेच्या विभागस्तरीय शिक्षक समस्या निवारण सभेत सवाल
Amravati “आमदार-खासदारांना पेन्शन मिळू शकते, तर आयुष्यभर शासनाच्या सेवेत योगदान देणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन का नाही?” असा परखड सवाल माजी आमदार बच्चू कडू Bacchu Kadu यांनी उपस्थित केला. ते प्रहार शिक्षक संघटनेच्या अमरावती विभागस्तरीय शिक्षक समस्या निवारण सभेत बोलत होते.
या सभेचे आयोजन कुरळ पूर्णा येथे करण्यात आले होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बच्चू कडू उपस्थित होते. सभेला अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ यासह विविध जिल्ह्यांतील शेकडो शिक्षकांनी हजेरी लावली. जिल्हा परिषद, खासगी अनुदानित-विनाअनुदानित, महानगरपालिका, नगरपालिका आणि आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Vijaya Agrawal on Sajid Khan Pathan : वक्फ सुधारणा विधेयकावर दिशाभूल नको
सभेचे प्रास्ताविक प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी केले. त्यांनी संघटनेच्या गेल्या नऊ वर्षांच्या कार्याचा अहवाल संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांना सादर केला. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. दीपक धोटे, प्रहार जनशक्ती पक्षाचे राज्य प्रवक्ते जितू दुधाने, कसबे गव्हाणचे सरपंच शशिकांत मंगळे, अचलपूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते.
“शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी लवकरच शासनदरबारी मोठे आंदोलन उभे करू,” अशी आक्रमक भूमिका बच्चू कडू यांनी यावेळी स्पष्ट केली. सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष अमर भागवत यांनी केले, तर आभार विभागीय सचिव अमोल आगे यांनी मानले.
कार्यक्रमात प्रहार शिक्षक संघटनेचे पाचही जिल्हाध्यक्ष शरद काळे, मंगेश टिकार, महिंद्र रोठे, कुलदीप डंबारे, महादेव ठाकरे तसेच अकोला प्रसिद्धीप्रमुख अमित फेंडर, नागेश जोगदे, हेमंत बोरकर यांचा बच्चू कडू यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
Mahayuti Government : तीन गॅस सिलिंडर मोफत योजनाही गुंडाळली!
सभेदरम्यान प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांना ‘शिक्षक हृदयसम्राट’ पुरस्कार प्रदान केला.








