Breaking

Prahar’s Agitation : दादांची दादागिरी संपली..!

Bachchu Kadu said that Ajit Dada’s Dadagiri is over. : तीन जूनला पंकजा मुंडेंच्या गावात, तर ६ जूनला फडणवीसांच्या घरी – चटणी भाकर घेऊन जाऊ

Nagpur : दिव्यांगांना वेळेवर पेन्शन देऊ, असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला होता. पण हा शब्द पाळला गेला नाही. दिव्यांग बांधव अजूनही हक्काच्या पेंशनपासून वंचित आहेत. पूर्वी दादांचा शब्द म्हणजे प्रमाण होता. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. ‘दादांची दादागिरी संपली..’, हे सांगायला आम्ही बारामतीला जाणार आहो, असे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

बारामतीनंतर आम्ही तीन जूनला पंकजा मुंडे यांच्या गावाला जाऊ. त्यानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या गावात जाऊन कर्जमाफीबद्दल आम्ही बोलणार आहोत. ६ जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चटणी – भाकर घेऊन जाणार आहोत. त्यांना पुन्हा विनंती करू की, शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ करा. तरीही नाही झाली तर मी स्वतः राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज मोझरी येथे ७ जूनपासून सर्व मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहे, असे बच्चू कडू यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule : भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही रक्तदान आंदोलन केलं. पण रक्तदानासारख्या राष्ट्रीय कार्यालादेखील आम्हाला मनाई करण्यात आली. हा मुर्खपणा जगाच्या पाठीवर फक्त महाराष्ट्रातच पहायला मिळाला. रक्तदान करण्यासाठी अडवले जाते, याला काय म्हणावे? आधी आमचं रायगड आंदोलन झालं नंतर मशाल आंदोलन आणि आता रक्तदान आंदोलन आम्ही केलं. २ जूनला अजित पवार यांच्या घरासमोर चार ते पाच हजार लोक एकत्र होऊ आणि बजेटचा संक्षिप्त उतारा अजितदादांसमोर मांडू.

Youth Congress : कुणाल राऊत म्हणतात, व्हेंडरने दिली राजकीय कारकिर्द बरबाद करण्याची धमकी

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र येण्याची गरजच नाहीये. कारण ते एकच आहेत, याचे वाट्टेल तेवढे पुरावे मी देतो. जशी चाणक्य निती होती, तशीच ही पवार निती आहे, असे बच्चू कडू म्हणाले. यापूर्वी अजित दादा भाजपसोबत गेले होते, म्हणून दादांचं नाव घेत राष्ट्रवादीचे लोक फुटले. हे सर्व भाजपचं राजकारण आहे. काहीही करा पण सत्ता मिळवा, हेच भाजपचे धोरण आहे, अशी टीका बच्चू कडू यांनी केली.