No single party will get majority: मतदार जागृत आहेत, नेत्यांना सुधारण्याची गरज असल्याचा टोमणा
Akola मतदानाची मुदत संपायला आली असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाच्या दिवशीच निकालाबाबत एक महत्त्वाचे भाकीत केले आहे. अकोल्यात त्यांच्या पत्नीसह मतदानासाठी पोहोचल्यावर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की या महापालिका निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार नाही.”
प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले की बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आणि इतर नगरपालिकांमध्ये कोणताही पक्ष पूर्णपणे सत्ता मिळवू शकणार नाही, त्यामुळे या निवडणुकीचा परिणाम राजकीय बदलाच्या दिशेने जाईल. त्यांचे मत आहे की, विविध राजकीय पक्षांची सत्ता समतोल राहण्याची शक्यता आहे.
आंबेडकर म्हणाले की, “मी या वर्षीच्या नागरी निवडनुकांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ही निवडणूक निर्णायक ठरेल आणि गेल्या दहा वर्षांचे भाजपचे वर्चस्व संपवेल.” असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. पैशांच्या वाटपाबाबतही त्यांनी आपले मत नोंदवले आहे. ते म्हणाले, “निवडणुकीमध्ये पैशांचा वाटप केल्याच्या घटना घडत आहेत, परंतु मतदार स्वतःच अशा लोकांना दूर करत आहेत.” हा लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत असल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.
Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार म्हणाले निवडणूक प्रक्रियेत क्रांतिकारी बदल आवश्यक
ते म्हणाले की,“आजचा मतदार अधिक जागरूक झाला असून आता नागरिकच नेत्यांना सुधारत आहेत आणि गरज पडल्यास त्यांना धडाही शिकवत आहेत. लोकशाहीत मतदारांची भूमिका अधिक ठळक होत चालली आहे.”
राज्यभरात आज मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह आणि सहभाग पाहायला मिळत आहे. तरीही काही ठिकाणी मतदारांच्या उपस्थितीत कमी प्रमाण दिसून येत असून, संध्याकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांना मैदानात उतरवले आहे. उद्या कळणार आहे की कोणत्या उमेदवारांचे भविष्य सुरक्षित झाले आहे आणि कोणत्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.








