व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Prakash Ambedkar : वंचितच्या नेत्यांनी सोडली आंबेडकरांची साथ, शिवसेनेत प्रवेश

Prakash Ambedkar : वंचितच्या नेत्यांनी सोडली आंबेडकरांची साथ, शिवसेनेत प्रवेश

vanchit bahujan aghadi leaders joins EKnath Shinde shivsena : अकोल्यात आरपीआयलाही धक्का; एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Akola वंचित बहुजन आघाडीचे नेते देवेश पातोडे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) चे नेते राजकुमार सिरसाट यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला.

या वेळी शिवसेना राज्य समन्वयक ललित वानखेडे यांच्या पुढाकाराने सामाजिक कार्यकर्ते सतिश शिरसागर तसेच संगीत दिग्दर्शक सचिन निंबोकार यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पक्षप्रवेशानंतर बोलताना देवेश पातोडे आणि राजकुमार सिरसाट यांनी सांगितले की, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांसाठी प्रभावीपणे काम करण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Sajid Khan Pathan : आमदाराच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट, ५०० रुपयांचा दंड

यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आगामी काळात पक्षाच्या आदेशानुसार जबाबदाऱ्या पार पाडून संघटन बळकट करण्यासाठी ते सक्रिय राहतील. दरम्यान, प्रवेश करणाऱ्या सर्वांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य समन्वयक ललित वानखेडे तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.

error: Content is protected !!