Shivsena Shinde camp leader slams Thackeray Brothers : राज ठाकरे वैफल्यग्रस्त; मराठी माणसाच्या नावाने सत्तेसाठी ‘चावडी’ मांडल्याचा आरोप
Mumbai मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) दाखल झालेले आक्रमक नेते प्रकाश महाजन यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा समाचार घेताना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. “दोन भाऊ सत्तेसाठी एकत्र आले असले तरी त्यांचे हिंदुत्व आणि मराठी अस्मिता बेगडी आहे. उद्या चुकून सत्ता आलीच, तर दोघांच्या बायकोत भांडण लागेल,” असे बोचरे विधान करत महाजन यांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.
राज ठाकरे यांच्या बदललेल्या भूमिकेवर निशाणा साधताना प्रकाश महाजन म्हणाले की, राज ठाकरे सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत. “सत्तेसाठी त्यांनी हिंदुत्व बाजूला ठेवले आहे. ज्यांना ‘चंदू मामा’ प्रिय होते, त्यांनी आता सत्तेसाठी ‘रशीद मामू’ला जवळ केले आहे,” असा टोला त्यांनी लगावला. मराठी माणूस हा केवळ त्यांच्या प्रचाराचा मुखवटा आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांच्या संपत्तीत बदल झाला नसेल, पण सर्वसामान्य मराठी माणसासाठी यांनी काहीही केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
Municipal election : नाशिकमध्ये १५ प्रभागांत चुरशीचा रणसंग्राम; प्रमुख नेत्यांमध्ये टफ फाइट
या संयुक्त मुलाखतीवर भाष्य करताना महाजन यांनी मुलाखत घेणाऱ्यांवरही टीका केली. “चित्रपटसृष्टीतील कोणी मोठे व्यक्तिमत्व न मिळाल्याने एका संपादकाला (संजय राऊत) मुलाखत द्यावी लागली,” असे म्हणत त्यांनी राऊतांची खिल्ली उडवली. “महेश मांजरेकर यांना कशाची भीती वाटते? त्यांचे मित्र तर अंडरवर्ल्डमध्ये आहेत,” असे खळबळजनक विधान करत त्यांनी मांजरेकरांनाही लक्ष्य केले.
Internal Rift in MNS : ‘मनसेला विषारी इंजेक्शन देऊन मारण्याचा डाव’; संतोष नलावडे यांचे खळबळजनक पत्र!
उद्धव ठाकरे यांनी कधीही आत्मपरीक्षण केले नाही आणि राज ठाकरे केवळ सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले आहेत. मात्र, मुंबईत शंभर टक्के महायुतीचीच सत्ता येईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. “मराठवाड्यात शिवसेना (शिंदे गट) पहिल्या क्रमांकावर आहे, तर मुंबईत मनसेतून लोक बाहेर पडत आहेत, हेच ठाकरे बंधूंच्या अपयशाचे लक्षण आहे,” असेही ते म्हणाले.








