252 pornographic videos, 1497 photos Chakankar’s information : 252 अश्लील व्हिडिओ, 1497 फोटो चाकणकरांची माहिती
Pune : पुण्यातील खराडी येथील रेव्ह पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये महिलांचे 252 अश्लील व्हिडिओ आणि 1497 आक्षेपार्ह फोटो आढळून आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई असून ते सध्या तुरुंगात आहेत. या पार्टीत पोलिसांनी गांजासदृश पदार्थ, दारूच्या बाटल्या, कोकने, हुक्का पॉट आणि इतर अमली पदार्थ जप्त केले होते.
पार्टीच्या ठिकाणी प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. खेवलकर यांच्या हडपसरमधील घरातून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलचे सायबर विश्लेषण करताना हिडन फोल्डरमध्ये महिलांच्या नग्न आणि अर्धनग्न फोटोंसोबतच पार्टीचे व्हिडिओ आणि अश्लील चॅटिंग सापडल्याची माहिती देण्यात आली आहे. व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सात महिलांचे तपशील समोर आले असून त्यांना आरूष या नावाने सेव्ह करण्यात आले होते. हा आरूष नावाचा व्यक्ती महिलांची तस्करी करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Dharmapal Meshram : आदिवासी फासेपारधींच्या वस्त्यांमध्ये दाखले वाटप करण्यासाठी शिबीरे घ्या !
तपासात असेही समोर आले आहे की या महिलांना लोणावळा आणि पुण्यातील हॉटेल्समध्ये बोलावण्यात आले होते आणि चित्रपटांत संधी देण्याच्या आमिषाने त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून खर्चाचे पैसे घेऊनही त्यांना ना चित्रपटात काम देण्यात आले, ना पैसे परत करण्यात आले, अशी माहिती चाकणकर यांनी दिली आहे. महिला आयोगाने या प्रकरणाचा तपास महिला तस्करीच्या दृष्टीने करावा अशी मागणी पोलिसांकडे केली आहे.