Breaking

Prashant Koratkar : कोरटकर खोटं बोलला, धमकी देणारा आवाज त्याचाच!

Kolhapur Police claims based on CDR, Koratkar himself gave the threat : कोल्हापूर पोलिसांचा दावा; CDR मधून ‘दूध का दूध’

Nagpur सीडीआरचा Call detail record आधार घेऊन कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकरच्या कारनाम्याचा पर्दाफाश केला आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा आवाज कोरटकरचाच आहे, असा दावा कोल्हापूर पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आता कोरटकरचे पाय अधिक खोलात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

इंद्रजित सावंत Indrajit Sawant यांना कोल्हापुरात येऊन मारण्याची धमकी कोरटकरने दिली होती. याशिवाय ‘छावा’ चित्रपटाच्या निमित्ताने सावंत यांना शिविगाळही केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अत्यंत वादग्रस्त विधान त्याने केले होते. सावंत यांनी ऑडिओ क्लिप व्हायरल केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

Wardha Collector : संभाव्य पाणीटंचाई कृती आरखाडा तयार!

समाज माध्यमावर क्लिप व्हायरल झाल्यामुळे कोरटकरच्या विरोधात असंतोष उफाळून आला. त्यावर तो आवाज माझा नाहीच, असा दावा कोरटकरने केला होता. मात्र, त्याच्या विरोधात कोल्हापुरात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर सायबर पोलिसांच्या मदतीने सीडीआर तपासण्याचे काम सुरू झाले. दरम्यान कोल्हापूर पोलीस नागपुरात दाखल होण्यापूर्वीच कोरटकर पसार झाला. तो सध्या मध्यप्रदेशात असल्याची माहिती आहे.

आता कोल्हापूर पोलिसांनी सीडीआर उघडकीस आणला आहे. त्यात त्यांनी सावंत यांना धमकी देणारा आवाज कोरटकरचाच आहे, असं स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर तोंडघशी पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कोरटकरवर आता पोलीस कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Prakash Ambedkar on Pune Swargate Rape Case : योगेश कदम यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

पहिले कोल्हापूर, आता नागपूर
‘जिथं असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवून देऊ. तुम्ही कितीही मराठे एकत्र करा,’ असे म्हणत कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली. तसेच या प्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात प्रशांत कोरटकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे नागपुरातही बेलतरोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल झाले आहेत.