Kolhapur Police in Nagpur to arrest Prashant Koratkar : मंगळवारपासून नागपुरातून गायब, पण घराला पोलिसांची सुरक्षा
Nagpur छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. तसेच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनाही शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. या आरोपांसाठी कथित पत्रकार प्रशांत कोरटकर याच्यावर कोल्हापुरात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलीस नागपुरात दाखल झाल्याची माहिती आहे. कोरटकरला अटक करूनच कोल्हापूर पोलीस परतणार असल्याचे कळते.
प्रशांत कोरटकर याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. ‘कोरटकर याला ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरचे पोलीस पथक दुपारी कोल्हापुरातून निघाले. ते रात्री नागपुरात पोहचणार आहे,’ अशी माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करुन कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी कोरटकरने दिली होती.
Rashtriya Swayamsevak Sangh : संघ मुख्यालय परिसरात Camera Banned!
कोरटकरने रात्री बाराच्या सुमारास इंद्रजित सावंत यांना फोन करून शिविगाळ केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अर्वाच्च्य शब्दांत दावे केले. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही वापर त्याने केला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सकल मराठा महासंघानेही त्याला दिसेल तेथे ठेचून काढण्याचे फर्मान काढले आहे.
कोरटकर याच्या घरासमोर सकल मराठा संघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. त्यामुळे नागपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेत कोरटकरच्या घराला सुरक्षा व्यवस्था पुरवली. पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे सामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. काही दिवस पत्रकारितेत काम केलेला प्रशांत कोरटकर बेसा मार्गावरील मनिषनगरात राहतो.
राज्य पोलीस दलातील जवळपास प्रत्येक आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत फोटो काढून सोशल मीडियावर कोरटकर पोस्ट करतो. आता त्याच्यावर कोल्हापुरातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यामुळे मंगळवार दुपारपासूनच तो पसार आहे. अटक होण्याची शक्यता असल्यामुळे कोरटकर घरी नाही. मात्र, त्याच्या घराला बेलतरोडी पोलिसांनी सुरक्षा दिली आहे, हे विशेष.
Prashant Koratkar : दिसेल तेथे ठेचून काढा… कोरटकरच्या विरोधात फर्मान!
बुधवारी सकाळी कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा महासंघाचे काही कार्यकर्ते पोहचले. त्यांनी कोरटकरच्या घरासमोर आंदोलन केले. कोरटकरला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याने सार्वजनिक स्वरुपात माफी मागावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.