Breaking

Prashant Koratkar : कोरटकरच्या घरापुढे आंदोलन; अडचणी वाढल्या!

 

Protest in front of Prashant Koratkar’s house : इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याचे प्रकरण

Nagpur पत्रकार प्रशांत कोरटकर याने इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना कोल्गापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण आता चांगलेच गाजत आहे. राज्यभर कोरटकरच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशात नागपुरात कोरटकर याच्या घरापुढे आंदोलन करण्यात आले.

सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करुन कोल्हापूरमध्ये येऊन मारण्याची धमकी कोरटकर याने दिली होती. त्याच्या घरासमोर सकल मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्यामुळे नागपूर पोलिसांनी सावध पवित्रा घेत कोरटकरच्या घराला सुरक्षा व्यवस्था पुरवली. पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे सामान्य नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी पत्रकारितेत असलेला प्रशांत कोरटकर बेसा मार्गावरील मनिषनगरात राहतो. बुधवारी सकाळी कोरटकरच्या घरासमोर सकल मराठा महासंघाचे काही कार्यकर्ते पोहचले. त्यांनी कोरटकरच्या घरासमोर आंदोलन केले. कोरटकरला लवकरात लवकर अटक करावी आणि त्याने सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.

Chandrashekhar Bawankule : होय..! जयंत पाटलांना माझ्या बंगल्यावर भेटलो, पण..

कार्यकर्त्यांचे आंदोलन होताच पोलीस action mode मध्ये आले. कार्यकर्त्यांची समजूत घातली. त्यामुळे तणाव निवळला. प्रशांत कोरटकर याला राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्याचा नेहमी गृहमंत्रालयात वावर असतो. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करुन प्रशांत कोरटकर याने शिवीगाळ केली. तसेच घरात घुसून मारण्याची धमकी दिली. तसेच मराठा समाज आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केलीत.

कोरटकरने केलेल्या शिवीगाळीची ऑडिओ क्लिप इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत यांनी ‘सोशल मिडिया’वर टाकून कोरटकरचा खरा चेहरा समोर आणला. या प्रकरणी कोरटकरविरोधात कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागपूर पोलिसांनी कोरटकरच्या बेसा मार्गावरील घराला सुरक्षा प्रदान केली आहे.

Irrigation department : तापी मेगा रिचार्ज प्रकल्प रखडला; निधीअभावी विकासावर ब्रेक

कोरटकरने सुरक्षा व्यवस्था पुरविण्याची मागणी करण्यापूर्वीच नागपूर पोलिसांनी पोलिसांनी घराला सुरक्षा व्यवस्था पुरविल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. कोरटकरच्या घराला एक पोलीस उपनिरीक्षक, दोन पोलीस अंमलदार आणि दोन होमगार्ड असा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे.

तो मी नव्हेच
आपला आवाज कुणीतरी ‘मॉर्फ’ करुन धमकी दिल्याचा दावा कोरटकरने केला आहे. राज्यभरात पडसाद उमटताच ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका कोरटकरने घेतली आहे. मात्र, पोलिसांनी कोल्हापुरमध्ये मात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट आहे व अनेकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. यामुळे राजकारणदेखील तापले आहे. एकूणच या प्रकारामुळे चर्चेत आलेल्या प्रशांत कोरटकरच्या बेसा मार्ग परिसरातील घराला पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था पुरविली आहे.