File a case of treason against Prashant Koratkar : शिवसन्मान मोर्चा, जिल्ह्यातील संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग
Amravati छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांचा अपमान केल्याप्रकरणी नागपूर येथील प्रशांत कोरटकर याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी. या मागणीसाठी रविवारी अमरावतीत शिवसन्मान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने अमरावतीकर सहभागी झाले होते.
मोर्चादरम्यान कोरटकरच्या पुतळ्याला चपलांचा हार घालण्यात आला आणि घोषणांच्या गजरात हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाच्या समारोपासाठी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर सभामंच उभारण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी प्रशांत कोरटकरच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून, त्याला प्रतिकात्मक फटके मारले.
Vidarbha Farmers : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेस आक्रमक!
रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास शिवाजी महाराजांची मूर्ती ट्रॅक्टरवर ठेवून शांततेत मोर्चा सुरू झाला. मोर्च्यात काँग्रेस नेत्या ओमती ठाकूर, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, दर्यापूरचे आमदार बळवंत वांगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मोर्चाने गाडगेबाबा चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या वेळी राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चामध्ये शिवसन्मान परिषदेसह जिजाऊ ब्रिगेड, शिव ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध सामाजिक संघटना आणि इतर गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
Ex-Minister Sunil Deshmukh : महावितरणची प्रस्तावित दरवाढ ग्राहकांसाठी टेंशन
कोरटकरचे प्रकरण नेमके काय?
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना रात्री बारा वाजता प्रशांत कोरटकर याने फोन केला. त्याने कोल्हापुरात येऊन मारण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. कोल्हापूर आणि नागपूरमध्ये त्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या कोल्हापूर पोलीस त्याच्या शोधात आहेत.