Breaking

Pratap Sarnaik : आषाढीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन

5200 ST buses for the convenience of devotees – Transport Minister Sarnaik : भाविकांच्या सोयीसाठी एसटीच्या 5200 बसेस – परिवहन मंत्री प्सरनाईक

Mumbai : आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने 5200 बसेसची व्यवस्था केली आहे. या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक यांनी व्यवस्थित संदर्भात माहिती देताना सांगितले की, गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी करत आहेत. ऊन, वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात. आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आवळ होऊ नये, म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस एकादशीला उपवासाच्या पदार्थासह चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था केली आहे.

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांची राणेंवर टीका; ‘नेपाळी वॉचमन’ म्हणत ललकारल!

या निमित्ताने माणसातील विठुरायाची सेवा करण्याची संधी मिळत आहे. अर्थात, हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही. त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे. आषाढी वारीच्या काळात ५,६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक, विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.