Breaking

Prataprao Jadhav : स्वच्छता ठेवा आणि प्रवाशांना सौजन्यपूर्ण वागणूक द्या!

Everyone should work together for the progress of the warehouse : आगाराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे

Buldhana : मेहकर एसटी आगाराचा नावलौकिक पूर्वीपासूनच आहे. आज (२४ जानेवारी) त्यांच्या ताफ्यात दहा नव्या बसेस सामील झाल्या आहेत. सरकार आपलेच आहे आणि एसटी महामंडळाच्या प्रगतीसाठी अजूनही प्रयत्न करण्यात येतील, असे केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले.

राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नांतून मेहकर आगाराला दहा नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत. त्यांचे लोकार्पण आज पार पडले. बस गाड्यांची विधिवत पूजा राज्यमंत्री जाधव आणि रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आली. आगारात झालेल्या समारंभात शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाठीया, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष भूषण घोडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आगार व्यवस्थापक हर्षल साबळे, स्थानक प्रमुख प्रमोद सनगाळे आणि अन्य कर्मचारी यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

Nagpur Metro : प्रेमी युगलांचा मोर्चा मेट्रोकडे!

आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांनी आगाराच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात एसटी महामंडळाची प्रगती अधिक वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणा, स्वच्छता आणि प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, आगाराच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे, विशेषत: कर्मचारी वर्गाने त्यांची कार्यक्षमता आणि सेवा भावना कायम ठेवावी.

Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचं भविष्य ‘हम दो – हमारे दो’, बावनकुळेंचे जोरदार प्रत्युत्तर !

संजय रायमुलकर यांनी आगाराच्या प्रगतीसाठी केलेले अनेक प्रयत्न, तसेच नवीन बसेस मिळवण्यासाठी सरकारकडून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आगाराच्या विकासासाठी साडेचौदा कोटी रुपये प्रस्तावित केले आहेत. अधिक नवीन बसेस मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी मान्यवरांच्या हस्ते चालक आणि महिला चालक संगीता लादे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे रसंचालन नागेश कांगणे यांनी केले आणि आभार प्रमोद संगळे यांनी मानले.