Forgetting political disputes, came together : एकत्र केली आरती; निवडणुकीत एकमेकांवर आरोप
Buldhana राजकारणातील तणाव आणि आरोपांच्या सावल्या मागे टाकत बुलढाण्यातील दोन प्रमुख नेते — केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड — आता एकत्र येताना दिसत आहेत. ग्रामदैवत जगदंबा मातेच्या यात्रा महोत्सवानिमित्त दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या आरती करत एकमेकांप्रती सौहार्दाचा संदेश दिला.
निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांची तीव्रता बघता दोन्ही नेते पुन्हा कधी एकमेकांचं तोंडही बघणार नाहीत, असे वातावरण होते. पण राजकीय भांडणाचं वय फार कमी असतं, असं म्हणतात, तेच खरं. विधानसभा निवडणुकीनंतर आमदार संजय गायकवाड यांनी खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर पक्षांतर्गत नुकसानकारक कारवाया केल्याचा ठपका ठेवला होता.
Mehkar Municipality : मेहकर पालिकेची अतिक्रमणविरोधी मोहिम तीव्र!
तसेच संजय रायमुलकर यांच्या पराभवासाठी देखील त्यांना जबाबदार धरले गेले होते. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता दोन्ही नेत्यांमध्ये सामंजस्य निर्माण झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. बुलढाण्याचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा मातेचा यात्रा महोत्सव चैत्र पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही चिखली रोडवरील मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.
यात्रेनिमित्त निघणाऱ्या पालखी वाहनाचे पूजन व आरती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड आणि माजी नगराध्यक्षा पूजाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडली.
Minister Girish Mahajan : मंत्र्याचे नाव सांगत २८ लाखांनी लुटले!
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, रामदास चौथनकर यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरतीदरम्यान “जगदंबा जगदंबा” च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.