Breaking

Prataprao Jadhav-Siddharth Kharat : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून पेटला श्रेयवाद

Political war over farmers’ aid : केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि आमदार सिद्धार्थ खरात आमने-सामने

Buldhana जिल्ह्यात २५ आणि २६ जून रोजी झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे झालेल्या मोठ्या शेतीच्या नुकसानीसाठी ७४ कोटी ४५ लाखांची आर्थिक मदत शासनाने मंजूर केली आहे. मात्र ही मदत आपल्या पाठपुराव्यामुळे मिळाल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केल्याने श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.

या अतिवृष्टीत जिल्ह्यात ९०,३८३ शेतकऱ्यांच्या ८७,३९० हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी त्यांना धीर देत तात्काळ मदतीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा केला. शासनाने ६ ऑगस्ट रोजी मदत मंजुरीचे परिपत्रक जारी केले.

Ajit Pawar : वाहतूक कोंडीवर अजित पवारांचा पहाटेचा दौरा

मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना सर्वाधिक लाभ
मेहकर विधानसभा मतदारसंघात या पावसात ११२ मिमी पर्जन्यवृष्टी नोंदली गेली. यात ६५,६०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून ६६ हजार शेतकरी मदतीस पात्र ठरले आहेत. यात जमिनी खरडून जाणे, फळबागांचे नुकसान, गाळ साचल्यामुळे पिकांचे नुकसान अशा प्रकारच्या हानीचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना ६६ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे.

Navneet Rana : माजी खासदार नवनीत राणा यांना व्हिडिओद्वारे जीवे मारण्याची धमकी

जून महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्याने ही मदत मिळाल्याचा दावा आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला आहे. त्यामुळे मदतीचे श्रेय कोणाला यावर आता राजकीय वाद रंगू लागला आहे.