Breaking

Pratibha Patil : माजी राष्ट्रपतींच्या गावातच पाणी नाही!

Water scarcity problem in former President of India’s village : टंचाईचा गंभीर प्रश्न; संतप्त नागरिक धडकले प्राधिकरणाच्या कार्यालयावर

Amravati दर्यापूर Daryapur तालुक्यातील माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे मूळ गाव असलेल्या चंद्रपूरमध्ये पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने संतप्त नागरिकांनी मंगळवारी थेट मजीप्राच्या चंद्रपूर येथील कार्यालयावर धडक देत कुलूप ठोकले.

चंद्रपूर येथील मुख्य पाण्याच्या टाकीमधून परिसरातील तब्बल २५ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणी तीन बगिचा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, ग्रामस्थांच्या आरोपानुसार यापैकी एक कर्मचारी ड्युटीवर असतानाही चंद्रपूर गावाचा पाणीपुरवठा बंद करून स्वतःच्या गावाला पाणीपुरवठा करतो.

BJP’s organizational elections : भाजपच्या निर्णयाने पश्चिम विदर्भातील इच्छुकांचा हिरमोड

याशिवाय, खल्लार स्टॉपवरील काही नळधारकांकडे पाणीपुरवठा करणाऱ्या वाल्वच्या चाव्या असून, हे लोक मनमर्जीनुसार कधीही पाणी उचलतात. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असून, चंद्रपूरच्या मुख्य टाकीतील पाण्याची पातळी सातत्याने घटत आहे. परिणामी, गावकऱ्यांना दररोज पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

या समस्येचा वारंवार त्रास होत असल्याने मंगळवारी चंद्रपूर गावातील महिलांसह अनेक नागरिकांनी सरपंच डॉ. चंचल गजभिये, पोलिस पाटील महेंद्र मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य विशाल घरहे यांच्या नेतृत्वाखाली मजीप्रा कार्यालयावर धडक दिली. संतप्त ग्रामस्थांनी कार्यालयाला कुलूप ठोकले तसेच इतर गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या वाल्वच्या चाव्या ग्रामपंचायतीकडे जमा केल्या.

यावेळी ग्रामस्थांनी, “जोपर्यंत संबंधित कर्मचाऱ्याची तातडीने बदली केली जात नाही व चंद्रपूर गावाला नियमित आणि मुबलक पाणीपुरवठा होत नाही, तोपर्यंत मजीप्रा कार्यालय उघडू दिले जाणार नाही,” अशी ठाम भूमिका घेतली.

Threat to Naib Tehsildar : बच्चू कडू यांच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

या आंदोलनामुळे परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेतील बेकायदेशीर हस्तक्षेप आणि दुर्लक्ष समोर आले असून, प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी चंद्रपूरकर करत आहेत.