Breaking

Praveen Gaikwad : संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं

The name of the organization contains a single mention of Chhatrapati Sambhaji Maharaj :संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख

Solapur : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली. येथील शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून हे काळं फासण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आधीच आक्रमक झालेले होते. त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता. यापूर्वी फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते. गायकवाड यांचा आज अक्कलकोटमध्ये, सत्कारच्यावेळी त्यांना काळं फासण्यात आले.शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी ही शाईफेक केली.पोलिसांनी शाईफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Jayakumar Gore : नाहीतर जेलमध्ये गेला असता, आता तरी सुधरा,

माझ्या हत्येचाच कट केला गेला होता! माझ्यावर तशा प्रकारचा हल्ला झालेला आहे! माझे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते संभाजी भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांमुळेच आज मी जिवंत आहे. या घटनेला संपूर्ण सरकार जबाबदार आहे, अशी प्रतिक्रिया प्रवीण गायकवाड यांनी दिली. तसेच, हा माझ्या एकट्यावर झालेला हल्ला नाही, कारण मी गेल्या 30 वर्षांपासून मराठा समाजासाठी काम करत आहे. हा मराठा समाजावर झालेला हल्ला आहे, असेही गायकवाड यांनी म्हटले.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना आज अक्कलकोट येथे काळं फासण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर, प्रतिक्रिया देताना सरकार आणि गृह खात्याला जबाबदार धरले आहे. यावेळी मोठा राडाही झाला होता, पोलिस आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. हा माझ्यावर नाही तर पुरोगामी विचारांवर हल्ला आहे असेही त्यांनी म्हटलं. शिवधर्म प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी काळं वंगण तेल टाकलं, माझ्यावर हल्ला केला, मला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही जी विचारधारा आहे, डॉ. पानसरे, कलबुर्गी, दाभोळकर यांचा खून झाला. गौरी लंकेश यांचाही खून झाला, सध्याच्या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते असुरक्षित आहेत. असेही ते म्हणाले.

Ajit Pawar: ‘ नेमका कुठला निधी मिळाला नाही मी त्याला विचारतो,’

दरम्यान या घटनेवरून सरकारवर टीका होत असून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा सरकार पुरस्कृत हल्ला असल्याचे म्हटले आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गायकवाड यांची फोनवर चौकशी केल्याची माहिती समोर येत असून अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनीही घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.