Generic medicines should be provided from the medical stores of hospitals, demand of Praveen Darekar : भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांची मागणी
Mumbai : राज्यातील रुग्णालयांत मेडिकल स्टोअर देऊन त्यात जनेरिक औषध असावीत असा केंद्र सरकारचा निर्णय आहे. त्या निर्णयाप्रमाणे राज्यासह मुंबईतील रुग्णालयांमध्ये जनेरिक औषधे उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासन ठोस निर्णय घेणार का, असा सवाल भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी उपस्थित केला.
विधानपरिषदेच्या सदस्या उमा खापरे यांनी जनेरिक औषधां संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सहभाग घेत आमदार दरेकर यांनी जनेरिक औषधं ठेवण्यासाठी बंधनकारक करता. परंतु आजही कुठल्याही प्रकारे त्याची सक्ती नाही. जनेरिकला अतिशय दुर्लक्षित केले जातेय. राज्यात रुग्णालयांना मेडिकल स्टोअर द्यावीत आणि त्यात जनेरिक औषधे असावीत, असा केंद्र सरकारचा आग्रह आहे. त्याला मान्यताही मिळाली. याबाबत महाराष्ट्रातील व मुंबईतील रुग्णालयांच्या बाबतीत हा निर्णय देणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
Pravin Darekar : नागपुरातील घटना ही पूर्वनियोजित कट, मास्टरमाईंड शोधून कारवाई करा !
डॉक्टरांना सक्तीच्या सूचना केल्या जातील. त्यांनी औषधं देताना जेनेरिक किंवा ब्रँडेड असे लिहून द्यावे. जेणेकरून मेडिकल स्टोरमध्ये बदल केला जाणार नाही, असे सकारात्मक उत्तर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले.
Pravin Darekar : पर्याय नसल्याने शेतकरी सावकारांच्या दारात जातो!
काय आहेत जेनेरीक औषधी ?
जेनेरिक औषधी म्हणजे प्रजातीय औषधी. यामध्ये कंटेंटचे प्रमाण, गुणवत्ता आणि त्याचे परिणाम नियमित ब्रॅंडेच औषधांसारखेच असते. पण याला कोणतेही नाव नसते. रंग, आकार आणि वेष्ठनही वेगळे असते. विशेष म्हणजे सरकार नियमांप्रमाणे ही औषधी तयार केलेली असतात. रासायनिक दृष्ट्या सारखीच प्रभावी असतात आणि ब्रॅंडेड औषधांच्या पेटंटची मुदत संपल्यावर बाजारात उपलब्ध होतात. महत्वाचे म्हणजे तुलनेत स्वस्त असतात.