Pravin Datake : भाजपच्या आमदाराचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Make the Nagpur Improvement Trust land ‘free hold’ : NIT च्या जागा फ्री होल्ड करण्याची केली विनंती

Nagpur आमच्या प्रतिनिधीकडून शासनाच्या महसुल विभागाने, नझुलच्या जमीनी फ्री होल्ड केल्या, महापालिकेने आपल्या ताब्यातील जागा दोन टक्के निधी आकारून फ्री होल्ड केल्या. त्याच धर्तीवर नागपूर सुधार प्रन्यासने देखील त्यांची मालकी असलेल्या आणि लीजवर नागरिकांना दिलेल्या जागा ‘फ्री होल्ड’ कराव्या, यामुळे नागपूर शहरातील पन्नास हजार कुटुंबांना फायदा होईल अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दटके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात प्रवीण दटके यांनी नागपूर शहरातील दोन नियोजन प्राधिकरणांच्या वेगवेगळ्या कार्यपध्दतीकडे लक्ष वेधले आहे. ‘ राज्य सरकार नझुलच्या जागांची मालकी, जनतेला देऊ शकते. महापालिका देऊ शकते मग नासुप्रला काय अडचण आहे. नासुप्र पट्टेवाटप करते मग त्यांना जागा फ्री होल्ड करण्यास अडचण काय आहे? नासुप्र वेगळ्या देशाच्या कायद्यांनी चालते का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Local Body Elections : इच्छुकांच्या भेटीगाठी वाढल्या, नेत्यांच्या दरबारी चकरा वाढल्या

नागपूरच्या जनतेला वेगवेगळे कर भरावे लागतात. त्यांना महापालिकेचा मालमत्ता कर भरावा लागतो, नासुप्रचा भूभाटक कर (ग्राऊंड रेंट) वेगळा भरावा लागतो. अकृषक कर भरावा लागतो. एकाच शहरात दोन दोन नियोजन प्राधिकरणे असल्याने करांचा घोळ आहे. नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणारी महापालिका जागा फ्री होल्ड करते आणि नासुप्र करीत नाही असे कुठल्या नियमाने होते? शहरात नासुप्रची जमीन भाडेपट्टीवर घेतलेले किमान ५० हजार परिवार आहेत. त्यांच्याकडून शासकीय नियमानुसार निधी घेऊन, त्यांचे प्लॉट फ्रीहोल्ड केले तर नागपुरकरांना मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा दटके यांनी व्यक्त केली आहे.