Breaking

Pravin Datke : आमदार प्रवीण दटकेंनी विधानसभेतही पाडली छाप !

 

MLA Praveen Datke also made an impression in the Legislative Assembly : नागपुरातील प्रलंबित कामांकडे वेधले सभागृहाचे लक्ष

Mumbai : भाजपचे आमदार प्रवीण दटके पूर्वी विधानपरिषदेचे सदस्य होते. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना संधी दिली आणि त्यांनी त्या संधीचे सोने केले. मध्य नागपूर मतदारसंघातून ते निवडून आले. विधानपरिषदेचे सदस्य असतानाही त्यांनी सभागृहात महत्वाचे प्रश्न निकाली लावलेले आहेत. आता त्यांनी नागपूर शहरातील महत्वाच्या प्रबंलित कामांकडे सभागृहाचे लक्ष वेधून विधानसभा सभागृहातही आपली छाप पाडली.

पुरवणी मागण्यांवर बोलताना आमदार दटकेंनी नागपुरातील दोन्ही मेडिकल कॉलेज, डागा हॉस्पीटल, तेथील होस्टल, रवी भवन, नाग भवन, आमदार निवास, जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आदी समस्या मांडल्या. ते म्हणाले, नागपुरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय GMC आणि मेयो हॉस्पीटल हे मोठे मेडिकल कॉलेज आहेत. येथे शिकाऊ डॉक्टरांना राहण्यासाठी होस्टल लागतात. त्यासाठी तीन प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यासाठी निधी द्यावा.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांकडून नागपूरकरांना दिलासा!

शासकीय रवी भवन, नागभवन आणि आमदार निवास हे सीपी अॅंड बेरार काळापासून आहेत. दरवर्षी हिवाळी अधिवेशनात तेथे डागडुजी केली जाते. पण तरीही या वास्तू राहण्यायोग्य होत नाहीत. अनेक आमदारांना हॉटेलवर किंवा इतरत्र राहावे लागते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला विनंती आहे की, तिन्ही वास्तुंचे नवीन बांधकाम करावे. आमदारांसाठी तीन खोल्यांची निवास व्यवस्था असावी.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. मागे अजित पवारांनी या इमारतीसाठी तरतूद केली होती. त्याचा कार्यादेशही झाला. पण निधी मात्र मिळाला नाही. बांधकाम विभागाकडे त्याचे पैसे आले नाहीत. हा निधी लवकरात लवकर द्यावा, अशी मागणी आमदार दटके यांनी केली.

MLA Pravin Tayde : अचलपूरच्या आमदाराविरुद्ध प्रहार आक्रमक!

सार्वजनिक आरोग्य विभागाचे दोन दवाखाने नागपुरात आहेत. यांपैकी एक डागा हॉस्पीटल आहे. येथे महिला लहान बाळ दाखल असतात. या रुग्णालयाला ५२ वर्ष झाले. प्रसुतीसाठी आलेल्या भगीणी आणि बाळांसाठी योग्य व्यवस्था नाही. यंत्रसामग्रीचा तुटवडा आहे. याबाबत अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. काही प्रकरणांत तर पोलिसांतही तक्रारी झाल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयालाही निधीची आवश्यकता आहे, तो तात्कार उपलब्ध करून द्यावा, असे ते म्हणाले.

Vijay Wadettiwar : मुख्यमंत्रीच सर्व जिल्ह्यांत झेंडा फडकविणार का?

 

नागपुरात जिल्हा रुग्णालय तयार होत आहे. २०१४ ते १९ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना निधी मिळाला होता. दवाखाना तयार झाला आहे. मशीनरी आल्या आहेत. पण अद्याप तेथे स्टाफ न मिळाल्याने हे रुग्णालय धुळखात पडले आहे. हा प्रश्न तात्काळ मार्गी लावणे गरजेचे आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत महिलांकरीता ईरीक्षासारख्या अनेक योजना आहेत. पण पूर्वी महिला बचत गटांना मिळणारे काम आता मिळत नाही. त्यांना पूर्वी मिळत असलेली कामे सेंट्रलाईज टेंडरमध्ये जाण्याजी भीती आहे, असे होऊ नये आणि त्यांना पूर्वीप्रमाणे कामे मिळावी, अशीही मागणी आमदार प्रवीण दटके यांनी केली.