Breaking

Pravin Datke : महीला पोलिस कर्मचाऱ्याचे कपडे फाडण्याचा प्रयत्न !

MLA Praveen Datke told the House the horrifying reality of the violence : नागपूर हिंसाचारातील भयावह वास्तव

Mumbai : नागपूरच्या महालमधील भालदारपुरा भागात सोमवारी (१७ मार्च) सकाळी विश्व हिंदू परिषदेने औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी त्याच परिसरात हिंसाचार सुरू झाला. त्यावेळी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अधिकारी, कर्मचाऱ्यांना जमावाने मारहाण केली आणि महिला पोलिस कर्मचाऱ्यावर अत्याचार करण्याच प्रयत्न जमावाने केल्याचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहाला सांगितले.

यासंदर्भात आज (१९ मार्च) सभागृहात बोलताना आमदार दटके म्हणाले, सोमवारी नागपूरच्या महालमधील भालदारपुरा परिसरात दंगल उसळली. तेथे सुमारे ५०० लोकांचा जमाव होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस उपायुक्त निकेतन कदम, शशीकांत सातव. अर्चित चांडक, पोलिस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, नितीन राजकुमार, पोलिस उपनिरीक्षक व पाच कर्मचारी आणि दंगल नियंत्रक पथकातील एक महिला पोलिस, असे पथक तेथे गेले.

Vishwa Hindu Parishad : अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. दरम्यान शिवीगाळ सुरू झाली. धक्कादायक आणि शरमेची गोष्ट म्हणजे जमावातील काही लोकांनी महिला पोलिसाला पकडले. त्यांचे वस्त्र काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना दुसऱ्या बाजुला नेण्याचा प्रयत्न केला. ती महिला पोलिस कर्मचारी शुरवीर आहे. जमावातील लोकांचा प्रतिकार करत ती जमावातून बाहेर पडली. गुन्हेगारांची येवढी हिंमत होतेच कशी, असा सवाल आमदार दटके यांनी केला.

Vijay Wadettiwar : भडकाऊ वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या !

महिला पोलिस कर्मचाऱ्याने याची तक्रार नोंदवली आहे. या सर्व प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज आहे. तो पोलिस अधिकाऱ्यांकडे आम्ही दिला आहे. त्यातील नालायकांवर, त्या नराधमांवर कडक कारवाई करण्याचा आदेश सरकारला द्यावा, अशी मागणी आमदार प्रवीण दटके यांनी सभागृहाला केली