Pravin Datke : काँग्रेसची सद्भावना यात्रा म्हणजे राजकीय पोळी भाजण्याचा केवीलवाणा प्रयत्न !

Pravin Datke said that Congress’ Sadbhavana Yatra is an attempt to Cook political Chapati : आंदोलनाचा आधार घेऊन शहरातील काही समाजकंटकांकडून तरुणांची माथी भडकवण्यात आली

Nagpur : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे काल (१६ एप्रिल) नागपूरच्या महाल परिसरात सद्भावना यात्रा काढण्यात आली. बोटांवर मोजण्याइतके नेते सोडले तर काँग्रेसचे जवळपास सर्वच नेते या यात्रेत आणि त्यानंतर झालेल्या सभेला हजर होते. ही यात्रा म्हणजे ‘मगरमछ के आंसू’ आहेत, असे म्हणत भाजपचे मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली.

यासंदर्भात आमदार दटके म्हणाले, औरंगजेबाची कबर हटवण्याकरिता नागपुरात करण्यात आलेल्या आंदोलनाचा आधार घेऊन शहरातील काही समाजकंटकांकडून तरुणांची माथी भडकवण्यात आली. या दंगेखोरांमुळे शांत असणाऱ्या नागपुरात दंगलीची दुर्दैवी घटना घडली. जेव्हा वातावरण शांत करण्याची गरज होती, तेव्हा काँग्रेसचा एकही नेता आला नाही. अन् आता सद्भावना यात्रा काढत आहेत. हे म्हणजे काँग्रेसचे मोठे ढोंग आहे.

Amol Mitkari : महापुरुषाचा ठेका कोणत्याही लोकप्रतिनिधीने घेतलेला नाही !

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न..
आज दंगलीला एक महिना पूर्ण होत होत आहे आणि आता काँग्रेसला जाग आली आहे. सद्भावना यात्रा काढून राजकीय पोळी भाजून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न काँग्रेसचे नेते करत आहेत . या दंगलीमध्ये ज्या सामान्य नागरिकांच्या वाहनांचे, दुकानांचे आणि घरांचे कोट्यवधींचे नुकसान झाले, त्यांच्याबद्दल एकही शब्द काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला नाही, असा घणाघातही आमदार दटके यांनी केला.

BJP Janata Darbar : भाजपच्या मंत्र्यांचा प्रत्येक महिन्याला प्रदेश कार्यालयात जनता दरबार !

उशीरा सुचलेले शहाणपण..
दंगलीची घटना घडल्यानंतर तातडीने शांतता प्रस्थापित करण्याची गरज होती. तेव्हा काँग्रेसचा एकही नेता पुढे आला नाही. परंतु आज झोपेतून जागे होऊन त्यांनी सद्भावना यात्रा काढण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे राजकीय स्वार्थ असल्याचे नागपूरकरांना आता कळले आहे. काँग्रेस नेत्यांना हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. 500 पावले चालून कोट्यवधींचे नुकसान झालेल्या माणसाचे दुःख त्यांना कळणार का? असा सवाल आमदार दटके यांनी केला. सरकारने दंगेखोरांवर कारवाई केली आहे. दंगलखोरांना आता त्यांच्याच भाषेत उत्तर मिळणार, मात्र निश्चित. शेवटी, ‘यह पब्लिक है, सब जानती है’, असेही ते म्हणाले.