With the efforts of MLA Datke, the spinning mill workers will get 50 crores : अधिवेशनांत केला होता पाठपुरावा, मिळाली वित्त विभागाची परवानगी
Nagpur : नागपूर – उमरेड मार्गावरील नागपूर विणकर सुतगिरणीतील कामगारांची देयके थकीत होती. गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांच्या थकित वेतनाचा प्रश्न प्रलंबित होता. शेवटी या कामगारांनी मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांना साद घातली. त्यांनी सकारात्कमक प्रतिसाद देत सुतगिरणीतील कामगारांचा प्रश्न हाती घेतला. अधिवेशनांमध्ये सातत्याने पाठपुरावा केला. अखेर आता हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे.
सुतगिरणीतील कामगारांना विशेष बाब म्हणून ५० कोटी रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याबाबत काल (५ ऑगस्ट) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. नागपूर विणकर सहकारी सूतगिरणी उमरेड रोड नागपूर येथील कामगारांच्या 31 मार्च 2008 पर्यंत पगार व इतर देयके देण्याबाबत आमदार दटके यांनी मागणी केली होती. त्यानुसार १३ जुलै २०२४ रोजी तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली होती.
आचारसंहितेच्या कारणामुळे तेव्हा निर्णय होऊ शकला नव्हता. यापूर्वीही नागपूर सहकारी सुतगिरणीचे कामगार आणि वस्त्रोद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत १३ ऑक्टोबर २००८ आणि २६ जून २०१६ रोजी बैठका झाल्या होत्या. परंतु कामगारांचे थकीत वेतन आणि आर्थिक लाभ देण्यासाठी वित्त विभागाची परवानगी मिळत नव्हती.
आमदार प्रवीण दटके यांनी या विषयाचा पाठपुरावा विधिमंडळ अधिवेशनाच्या माध्यमातून तसेच बैठकांच्या माध्यमातून शासनाकडे केला होता. अखेर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मार्गी लागला आहे. नागपूर विणकर सहकारी सुतगिरणी उमरेड रोड नागपूरच्या कर्मचाऱ्यांना ५० कोटी रुपयांचे सानुग्रह सहाय्य मंजूर करण्यात आले आहे.
Chandrashekhar Bawankule : माझ्या नावाने पोलिसांना दमदाटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा !
सूतगिरणीमधील ११२४ पैकी ६८५ कामगारांची संमती घेऊन ६२ कोटी रुपयांची देयके देण्याकरिता सूतगिरणीची जमीन १७७ कोटी रुपयांना विकण्यात आली. परंतु कामगारांचे ६२ कोटी देयके न देता केवळ १० कोटी देण्याचा निर्णय दिनांक ५ मार्च २०१९ रोजी घेण्यात आला होता. उर्वरित ५० कोटी रुपये देण्याबाबतचा निर्णय काल मंत्रिमंडळ बैठकीत झाला आहे.