Breaking

Pravin Togadia : फायरब्रँड प्रवीण तोगडियांचे बॅक टू पॅव्हेलियन?

 

Praveen Togadia’s organization may align with Vishwa Hindu Parishad : तोगडियांची संघटना विहिंपशी जुळण्याची शक्यता

Nagpur महाकुंभानंतर डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विश्व हिंदू परिषदेत विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात, तोगडिया यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी दोनदा भेट घेतली आहे. या मुद्द्यावर दोन्ही संघटनांचे पदाधिकारी बोलण्याचे टाळत आहेत.

२४ जून २०१८ रोजी तोगडिया यांनी विहिंपपासून वेगळे होऊन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना केली. संघाच्या ९९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच संघाशी संबंधित कोणत्याही संघटनेचे अशा प्रकारे विभाजन झाले. तोगडिया यांनी देशभर दौरे केले आणि विहिंप कार्यकर्त्यांना त्यांच्या संघटनेशी जोडले.

Accident in Nagpur : ब्रेकऐवजी दाबले एक्सलेटर, तिघांचा मृत्यू !

संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर शहरातही, विहिंप दोन गटांत विभागले गेले. तोगडिया यांच्या संघटनेत अनेक अधिकारी सामील झाले. त्यापैकी बहुतेक जण संघाच्या शाखेशी देखील संबंधित होते. अनेक वर्षांच्या कटुतेनंतर २०२४ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी सरसंघचालकांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी हिंदूंच्या ऐक्यासाठी एकत्र काम करण्याचा संकल्प केला.

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, यावेळी डॉ. भागवत यांनी हिंदूंच्या ऐक्यावर भर दिला आणि त्यांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले. तथापि, जानेवारीमध्ये प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू झाला ज्यामध्ये सर्वजण व्यस्त झाले. महाकुंभानंतर हे विलिनीकरण होऊ शकेल, असा सूत्रांचा दावा आहे.

Akash fundkar : मुलांनो, मेहनतीवर विश्वास ठेवा !

डॉ. प्रवीण तोगडिया यांनी यासंदर्भात स्पष्टपणे काहीही बोलण्यास नकार दिला. मी गेल्या महिनाभरापासून महाकुंभात व्यस्त आहे. हजारो लोकांच्या राहण्याची व्यवस्था केली जात आहे. लाखो लोकांना जेवू घालण्यासोबतच एक लाख लोकांना ब्लँकेट देण्यात आले आहेत. नागपूर, यवतमाळ, मेरठ इत्यादी ठिकाणांहून प्रयागराजला येणारे संघाचे स्वयंसेवकही आमच्याकडे थांबत आहेत. आम्ही सेवाकार्यात गुंतलेलो असून, इतर कुठल्याही मुद्द्यावर चर्चा झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.