President Draupadi Murmu Visit : बुलडाण्यातील ७९ रुग्णालये व्हेंटिलेटरवर, काँग्रेसचा दावा

congress-president-harshwardhan-sapkal-claims-79-hospitals-buldhana-in-bad-condition : आयुष विभागच आजारी असल्याची हर्षवर्धन सपकाळ यांची टिका

Buldhana आयुष विभागाला फक्त आरंभशूर असे म्हटले पाहिजे कारण बुलडाणा जिल्ह्यामध्ये 70 रुग्णालय आहेत जे सुरू झाले इमारती सुद्धा पूर्ण झाल्या. पण ही 70 रुग्णालयच कुठेतरी आजारी आहे, त्यांना पुरेसा निधी नाही, कर्मचारी नाही, औषध नाही त्यामुळे हे बंद पडलेल्या अवस्थेत आहेत, जी अवस्था बुलडाणा जिल्ह्याची आहे तीच अवस्था संपूर्ण महाराष्ट्राची आहे. त्यामुळे राष्ट्रपती येत असताना या सुरू झालेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष द्यावे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राष्ट्रपती ज्या तालुक्यामध्ये येत आहे त्या तालुक्यामध्ये केस गळण्याचे आणि नखे गळण्याचे प्रकार रेशनचे दुषित अन्न खाल्याने झाले. हे सरकारच्या माध्यमातून खाऊ घालण्यात आलेले रेशन आहे. एक वर्ष झाले पण हे केस गळती, नख गळती कशी होती याचे कारण समोर आले नाही. त्यासाठी अनेक पथके येऊन गेले पण काहीही हाती आलेले नाही.

BJP state body : भाजपने साधला विदर्भातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये बॅलन्स

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, दुषित अन्नाच्या माध्यमातून एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. त्यांच्या दबावापोटी हा सर्व अहवाल दाबण्यात आला. टक्कल व्हायरस म्हणून जो पुढे आला त्याने प्रशासनाचे टक्कल उघड पडल्यावरही आयुष विभागाने काहीही न करणे हे दुर्दैव आहे.राष्ट्रपतींच्या येण्याने हे 70 रुग्णालय कुठे तरी सुरू राहतील. केस गळती प्रकरणातील आरोपीवर कारवाई होईल.ते अन्न देशभरात कुठेही पोहचणार नाही. सोबतच कुपोषणाचा मोठा मुद्दा महाराष्ट्रात भेडसावत आहे, अशा वेळी प्रशासनाने त्यावर आंधळे बनून पडदा टाकण्याचे काम केले आहे.

Sudhir Mungantiwar : शेतकरी अडचणीत, मुनगंटीवार मैदानात, प्रति हेक्टर २० हजार धान बोनसची जोरदार मागणी!

हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, कुपोषणाचा मुद्दा, शाळेबाहेरील विद्यार्थी या गोष्टीवर राष्ट्रपती निर्देश देतील, अशी अपेक्षा आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून खूप मोठे रॅकेट हे महाराष्ट्रात कार्यरत आहे. त्यामुळे गावोगावी पाणीटंचाई निर्माण होणे सुरू झाले आहे. यात मोठ्या प्रमाणावर लूट झालेली आहे.लुट करणाऱ्यावर कारवाई व्हावीच व्हीवी. केवळ घोषणा न होत्या योजना पूर्ण व्हाव्या ही अपेक्षा आहे.